शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नविन पाणी पुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करण्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचे जी व्ही पी आर इंजिनियर्स कंपनीला आदेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 June 2022

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नविन पाणी पुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करण्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचे जी व्ही पी आर इंजिनियर्स कंपनीला आदेश

औरंगाबाद: ( मनपा आयुक्त कार्यालय) शहराला पाणीपुरवठा करणारी नविन पाणीपुरवठा योजनेच्या काम वेळेत पूर्ण करण्यासाठी काही अडचणी आल्यास शहर अभियंता यांच्याशी नियमित संपर्क करा त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास थेट माझ्याशी संपर्क करा मात्र पाणी पुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश मे जीव्हीपीआर इंजिनिअर्स कंपनीला  महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज मंगळवारी दिले असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चोवीस महिन्यात पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याची लेखी हमी दिली.

नविन पाणी पुरवठा योजनेसंदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयात आज मंगळवारी दुपारी आढावा बैठक झाली. या बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मनपा शहर अभियंता एस डी पानझडे व मे जीव्हीपीआर इंजिनिअर्स कंपनीचे जी शिवशंकर, निर्णय अग्रवाल यांच्याशीही पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली.नविन पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मे जीव्हीपीआर इंजिनिअर्स कंपनीला शहरात टाकण्यात येणाऱ्या एचडीपीई पाईप बाबत ब्लॅंकेट परमिशन दिली आहे. आमदार खासदार या लोकप्रतिनिधींच्या निधीतून होणार या रस्त्याच्या कामाचा प्लॅन महानगरपालिकेकडून घ्यावा त्यानुसार एचडीपीई पाईप लाईन टाकण्यात यावी,शहरातील देवळाई सातारा परिसर  चारशे किलोमीटर, 207 कोटीचे 85 किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे तत्पूर्वी एचडी पीई पाईप टाकण्याचे काम करण्यात यावे , 317 कोटी रूपयांच्या 221 किलोमीटर रस्त्यावर पाईप लाईन टाकत असताना तसेच सातारा देवळाई परिसरात  इतर ठिकाणी काही अडचणी असल्यास शहर अभियंता शी संपर्कात राहुन अडचणी सोडवाव्यात, शहरअभियंता यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास थेट माझ्याशी संपर्क करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. झालेल्या रस्त्यावर पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागणार असल्याने या नविन योजनेच्या निविदेमध्ये या खोदलेल्या रस्ते दुरुस्ती करण्यासाठी तीस कोटींची तरतूद करण्यात असल्याचे प्रशासकांनी सांगितले. 

*लवकर काम करण्यासाठी बाहेरून तयार पाईप मागविणार*

डी आय अँड एम एस स्टील चे पाईप जायकवाडी पासून 76 किलोमीटरची पाईपलाईन वेळेवर करता येणार नसल्याचे लक्षात येतात बाहेरून रेडीमेड पाईप आणण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासकांनी घेतला असून टाटा व जिंदल सारख्या स्टील कंपन्यांकडून सत्तर ते ऐंशी टक्के तयार पाईप मागविण्यात येणार असल्याची कंपनीने तयारी दर्शवली आहे. अकरा ते वीस महिन्यात जायकवाडी ते शहरापर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करणार असल्याचे जी व्हीपी आर कंपनीच्या वतीने सांगण्यात आले असून यावर महानगरपालिका आयुक्त तता प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाणीपुरवठ्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची ताकीद दिले असून कामात दिरंगाई चालणार नाही. पाणीपुरवठा योजनेचे काम वेळे पूर्ण व्हावा या दृष्टीने मिस कम्युनिकेशन ( विसंवाद) होऊ नये, शहर अभियंता यांच्याशी संपर्कात राहू वेळोवेळी कामा संदर्भात प्लॅन सादर केला पाहिजे 304 किलोमीटरचा मार्ग मोकळा करता यावा असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले त्यावर मनपा प्रशासक म्हणाले की, कामात अडचणी आल्यास शहर अभियंता यांना कळविण्यात यावी प्रतिसाद न मिळाल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे ते म्हणाले. जायकवाडीच्या जॅकवेल बसवण्यासाठी साॅईल सॅम्पलिंग तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून त्यावर लवकरात लवकर काम करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्यामध्ये मशिनरी नेण्यापूर्वी मनपाला कळविण्यात यावी असे निर्देश देऊन पाणी पुरवठा योजना मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश दिले असता जी व्ही पी आर इंजीनियर्स कंपनीचे जी शिव शंकर व निर्णय अग्रवाल यांनी 24 महिन्यात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून महानगर पालिकेला हस्तांतरित करण्याची लेखी हमी दिली . या बैठकीला शहर अभियंता एसडी पानझडे, जी व्ही पी आर इंजीनियर्स कंपनीचे जी शिवशंकर, निर्णय अग्रवाल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages