मिलिंद विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के 108 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 79 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 June 2022

मिलिंद विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के 108 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 79 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

कुंडलवाडी

जय भोसीकर :

नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेच्या निकालात येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद विद्यालयाचे सलग आठव्या वर्षी सेमी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला असून कु.लक्ष्मी नागेश खांडरे हिने 96 टक्के गुण घेऊन शाळेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला तर सर्व दितीय कुमारी नमिता गंगाधर तिपणे हिने 93.60 टक्के गुण तर सर्व तृतीय अनिकेत भिमेश मंदावार हा 92. 80 टक्के गुण घेतला  असून शाळेतून  एकूण 108 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 79 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर  प्रथम श्रेणीत 26  व दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शाळेतील सेमी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला असून गुणवत्ता टिकवून ठेवणारी शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जात आहे. शाळेच्या या उज्वल परंपरेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर सर ,उपाध्यक्ष जी.बी .वाघमारे सर ,सचिव गोपाळ वीर सर  व मुख्याध्यापिका सौ.एम.एस.खंदारे व माजी मुख्याध्यापक यु.एस. राठोड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages