केंद्रीय शिक्षण परिषदेत शिक्षकाने केला ऑक्सीजन पेरण्याचा संकल्प ! विद्यार्थी सर्वगुण संपन्न होण्यासाठी शिक्षकाने प्रयत्नशील असावे - केंद्रप्रमुख - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 29 June 2022

केंद्रीय शिक्षण परिषदेत शिक्षकाने केला ऑक्सीजन पेरण्याचा संकल्प ! विद्यार्थी सर्वगुण संपन्न होण्यासाठी शिक्षकाने प्रयत्नशील असावे - केंद्रप्रमुख


किनवट  : 

कमठाला केंद्रातील पहिली शैक्षणिक शिक्षण परिषद लोणी येथील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख विजय मडावी तर मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर उपस्थित केंद्रप्रमुख -शिक्षक -शिक्षिका यांना पुष्पगुच्छ किंवा शाल श्रीफळ न देता  शाळेच्या वतीने वृक्षरोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वांनी ऑक्सीजन पेरण्याचा संकल्प केला. 


केंद्रप्रमुख विजय मडावी मार्गदर्शन करतांना म्हणाले विद्यार्थी सर्वगुण संपन्न होण्यासाठी शिक्षकाने प्रयत्नशील असावे. लहान वयातच मुलांमध्ये नैतीक मुल्यांची रुजवणूक शिक्षकच करु शकतात. पर्यावरण जपण्याची जबाबदारी आपणावर आली आहे. म्हणून रमेश मुनेश्वर या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकाने सुरु केलेला 'चला ऑक्सीजन पेरुया' उपक्रम स्तुत्य वाटतो. असेही ते म्हणाले. त्यानंतर सुलभक प्रवीण पिल्लेवार आणि बाबासाहेब आढाव यांनी सेतु अभ्यासक्रम, विद्याप्रवेश, राष्ट्रीय संपादणूक अहवाल, राष्ट्रीय साक्षरता आणि संख्याज्ञान बद्दल सविस्तर माहिती दिली. कृतीयुक्त प्रात्यक्षिके घेण्यात आली. सुरुची भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तुत शाळेच्या तंत्रस्नेही शिक्षिका शाहिन बेग ह्यांनी केले. तर आभार उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमवार ह्यांनी मानले. यावेळी कमठाला केंद्रातील शिक्षक अंकुश राऊत, परमेश्वर महामुने, राजेश मोरताडे, नंदकुमार जाधव, देविदास वंजारे, राजेश गोलकोंडावार, राजू भगत, दत्तात्रय वाडे, विवेक पेगरलावार, शेखर कुमरे,  किशन धुर्वे, प्रशांत शेरे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका शालिनी शेलूकर, प्रीतम पाटील, धनरेखा सांगवीकर,  उर्मिला परभणकर, प्रमिला जाधव आदी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

वृक्षारोपण काळाची गरज आहे. वृक्ष लावून त्यांना जगवणं तितकच महत्त्वाचं. 'ऑक्सिजन पेरूया ' उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचा आनंद आहे. समतोल पर्यावरणासाठी वृक्षारोपण लोक चळवळ झाली तर भविष्यात एक वेगळाच निसर्ग पाहायला मिळेल.

- रमेश मुनेश्वर ( संकल्पक ' चला ऑक्सीजन पेरुया )


No comments:

Post a Comment

Pages