प्रतापसिंग बोदडे यांच्या स्मरणार्थ भीमगीतांचा कार्यक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 1 July 2022

प्रतापसिंग बोदडे यांच्या स्मरणार्थ भीमगीतांचा कार्यक्रम


नांदेड, दि. 1 : 

जय भोसीकर

महाराष्ट्राचे प्रख्यात आंबेडकरी कवी, गायक आणि महाकवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य प्रतापसिंग बोदडे यांचे दि. ३ जून रोजी मुक्ताईनगर येथे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी दि. 2 जून रोजी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


संविधान ॲकॅडमीच्या सम्राट अशोका बॅक्केट हॉल, शिवराय नगर जैन मंदिर चौक, मालेगांव रोड, तरोडा (खु) नांदेड येथे सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप कंधारे राहणार असून डॉ. अनंत सुर्यवंशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे, प्रा. रविचंद्र हडसनकर, डॉ. प्रमोद आंबाळकर तर प्रमुख पाहूणे म्हणून इंजि. प्रशांत इंगोले, माधव दादा जमदाडे, डॉ. विजयदादा कांबळे, सदाशिव शितळकर, पुर्व प्राचार्य बाबाराव नरवाडे, प्रा. डॉ. जे.टी. जाधव, इंजि. डी.डी. भालेराव, बी.बी. पवार यांची उपस्थिती राहणार आहे.



या प्रबोधन सांस्कृतिक कार्यक्रमात नागसेन दादा सावदेकर, आनंद किर्तने, साहेबराव येरेकर, ललकार बाबू, रमेश गिरी, माधव वाढवे, रविराज भद्रे, पोर्णिमा कांबळे, मिनाक्षी वाघोळे, अंजली गडपाळे, संगीता पवार आदि नामवंत कलावंत सहभागी होणार आहेत.  कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख संयोजक संजय निवडंगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages