आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एन. डी. गवळे यांचा उद्या कृतज्ञता सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 1 July 2022

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एन. डी. गवळे यांचा उद्या कृतज्ञता सोहळा

नांदेड – गेली 50 वर्षांपासून मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा,रिपब्लिकन विद्यार्थी संघ,दलित पँथर,मास मूव्हमेंट आदी ज्वलंत सामाजिक चळवळी आणि भारिप-बहुजन महासंघ,बहुजन समाज पार्टी ह्या राजकीय चळवळीत आपल्या अभ्यासू,लढावू,निरपेक्ष,समर्पित स्वभावाने आणि प्रसिद्धीपासून दूर राहून आपले सर्वस्व पणाला लावून लढणारे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एन. डी. गवळे ह्यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त प्रज्ञासूर्य समता परिषद आणि सामाजिक कृतज्ञता समितीच्या वतीने त्यांचा गौरव सोहळा उद्या दिनांक 2 जुलै 2022 शनिवारी ठीक संध्याकाळी 5 वाजता कै. नरहर कुरुंदकर सभागृह, पीपल्स कॉलेज परिसर,नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.


ह्या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. श्रीहरी कांबळे,विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक, वक्ते डॉ. व्यंकटेश काब्दे आणि प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी नेते दादाराव कयापाक,सुप्रसिद्ध वक्ते,सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि विचारवंत ऍड. विजय गोणारकर ह्यांची उपस्थिती लाभणार आहे.


ह्या सोहळ्यात एन.डी.गवळे ह्यांना ‘आंबेडकरी योद्धा ‘पुरस्कार आणि सामाजिक कृतज्ञता निधी देऊन गौरविण्यात येणार आहे.


ह्या सोहळ्यास सर्व परिवर्तनवादी बंधू-भगिनींनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन प्रज्ञासूर्य समता परिषद अध्यक्ष तथा मुख्य संयोजक डॉ. विलासराज भद्रे आणि सामाजिक कृतज्ञता समितीचे अध्यक्ष राज गोडबोले आणि सर्व पदाधिकारी, सल्लागार आणि सदस्य ह्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages