वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या अंतुर किल्ल्यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 17 July 2022

वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या अंतुर किल्ल्यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम

औरंगाबाद:

जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तरूणींसाठी गड स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.


याअंतर्गत आज कन्नड येथील अंतुर किल्ल्यावर स्वच्छता करण्यात आली. यावेळी जनार्धन विधाते उपविभागीय दंडाधिकारी(कन्नड),तहसीलदार संजय वरकड, वनविभागाची संपूर्ण टीम व इतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच या मोहिमेमध्ये पुढाकार घेतल्यामुळे इतर तरुणींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मोहिमेच्या सुरवातीलाच गड सुरक्षा अधिकारी सुनील गैर यांनी अंतुर किल्याचा इतिहास सांगत तरुणींना माहिती दिली. मोहिमेच्या शेवटपर्यंत सर्व शासकीय अधिकरी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.


मोहिमेत सहभागी तरुणींनी जिल्हाधिकारी कार्यालयातमार्फत उपलब्ध करून दिलेल्या सुविधेबदल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व उपविभागीय दंडाधिकारी जनार्धन विधाते यांचे आभार मानले. तरूणींसाठी स्थानिक व्यवस्था तहसीलदार संजय वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. या मोहिमेत ५० पेक्षा अधिक तरुणींचा सहभाग होता.


यावेळी तहसीलदार संजय वरकड,अनिल पाटील(वनपाल),

एस.आर.पवार वनरक्षक, मंडळ अधिकरी एस. बी देशपांडे., टी. के. वळकर मंडळ अधिकरी,ग्रामपंचायत कर्मचारी नागापूर, कोतवाल अनिल मोकासे,राजू खरात

तलाठी एस ऐ जांबूतकर, जी एस मोहिते. नागराव ढंगारे राजू मुळे ,अधिकराव ढोने आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages