नवी दिल्ली : महागाईचा भडका सहन करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता अजून एक मोठा फटका 18 जुलैपासून बसणार आहे. कारण, 18 जुलैपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये (GST) वाढ झालीय.
केंद्र सरकारच्या जीएसटी काऊंसिलने (GST Council) 18 जुलैपासून नवे दर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आता मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार, गहू यांसारखे पदार्थ महागणार आहेत. तर आरोग्य आणि शिक्षणसेवा देखील महागणार आहेत.
शोरूममध्ये ग्राहकाला कॅरीबॅगसाठी वेगळे पैसे मागणाऱ्या कंपनीला दंड
रेस्टॉरंटचं बिल आता कमी होणार, सर्व्हिस चार्ज कसा रद्द कराल?
रोजच्या गरजांच्या या वस्तूंसाठी ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.
'या' वस्तूंवर 5% जीएसटी
आजपासून पॅकेट बंद सामानांवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. याआधी पॅकेट बंद सामानांवर फक्त 5 टक्के जीएसटी लागू होता.
खरेदी
याशिवाय नारळ पाणी आणी फुटवेअरच्या कच्च्या मालावरही 12 टक्के जीएसटी लागणार आहे.
मासे, दही, पनीर, लस्सी, मध, मखाना, सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता पाच टक्के जीएसटी लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती.
आरोग्यसेवा महागणार
रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचऱ्यावर (Biomedical Waste ) प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
आरोग्य
इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
शैक्षणिक वस्तू महागणार
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे.
दरम्यान, अनपॅक केलेले, लेबल नसलेले आणि ब्रँड नसलेल्या वस्तूंना जीएसटीमधून सूट मिळेल.
No comments:
Post a Comment