मुंबई, दि. 6 : “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाअंतर्गत राज्यात साजऱ्या होणाऱ्या “स्वराज्य महोत्सवा”साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून दि. 30 जून रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” साजरा होणार आहे. याअंतर्गत तालुका व ग्रामस्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी राज्यातील 358 तालुके व 351 पंचायत समित्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत.
दि. 12 मार्च, 2021 पासून देशभरात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” हा उपक्रम सुरु झाला असून या अंतर्गत ऑगस्ट, 2023 पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.
No comments:
Post a Comment