खासदार इम्तियाज जलील संचलित जॉब ॲलर्ट्स व वसंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "मेगा जॉब फेअर" चे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 6 July 2022

खासदार इम्तियाज जलील संचलित जॉब ॲलर्ट्स व वसंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "मेगा जॉब फेअर" चे आयोजन


औरंगाबाद : शहरातील नामवंत वसंतराव नाईक  महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव निमित्त दहावी, बारावी, आय.टी.आय, डिप्लोमा, अभियांत्रिकी डिप्लोमा व पदवी धारक, बीए, बी.एस.सी., बी.कॉम व इतर  पदवी व पदव्युत्तर तसेच विविध शैक्षणिक अहर्ता प्राप्त सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतीसाठी वसंतराव नाईक महाविद्यालय व खासदार इम्तियाज जलील साहेब संचलित जॉब ॲलर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने "मेगा जॉब फेअर" चे (भव्य रोजगार मेळावा) दिनांक 9 जुलै 2022 शनिवार रोजी सकाळी 10 ते 5 वाजे दरम्यान वसंतराव नाईक महाविद्यालय, जालना रोड, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे. 

          सबब रोजगार मेळाव्यात 20 हून अधिक नामवंत कंपन्या व आस्थापना सहभागी होणार आहे. कंपन्या व आस्थापनाचे प्रतिनिधी उमेदवारांचे मुलाखाती घेवून निवड झालेल्या उमेदवारांना त्याच वेळी नियुक्ती पत्र दिले जाईल. विशेष म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नामवंत संस्था मार्फत मोफत कौशल्य प्रशिक्षणाची संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामवंत प्रशिक्षण संस्था नाव नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना तीन ते सहा महिने कालावधीचे विविध प्रकारचे कौशल्याचे मोफत प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी उपलब्ध करून देणार आहे.

         रोजगार मेळाव्यात नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी सोबत बायोडाटा घेवून यावे व ज्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण घेवून नोकरी पाहिजे त्यांनी शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड व फोटो सोबत आणावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages