लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना बार्टी संस्थेत अभिवादन.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 18 July 2022

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना बार्टी संस्थेत अभिवादन..

पुणे:

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी,पुणे येथे सोमवार दिनांक १८ जुलै २०२२ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समॄतिदिनानिमित  त्यांच्या प्रतिमेस   डॉ. ज्योत्स्ना पडियार ,अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख बार्टी, श्रीमती वॄषाली शिंदे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी,  यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ प्रेम हनवते, संशोधन अधिकारी,   विचार मांडताना  म्हणाले की , 

" जग बदल घालुनी घाव!  सांगून गेले मला भीमराव " तसेच  " फकीरा "  ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण करून आपल्या विचाराची दिशा अण्णाभाऊंनी  स्पष्ट केली. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज,  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचाराचा मार्ग अनुसरून अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यकृतीतून नवसमाज निर्मितीचा ध्यास घेतला 

 असल्याचे  प्रतिपादन डॉ.प्रेम हनवते  यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


डॉ. ज्योत्स्ना पडियार  ,अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा विभाग  प्रमुख बार्टी, श्रीमती वॄषाली शिंदे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी , श्रीमती प्रज्ञा मोहिते,  कार्यालयीन  अधीक्षक बार्टी, श्रीमती संध्या नारखडे, कार्यालयीन अधीक्षक, श्रीमती   मंजिरी देशपांडे, कार्यालयीन अधीक्षक,  श्री नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक,  श्री शफी शेख, प्रकल्प व्यवस्थापक, , श्री विकास गायकवाड, सहा . प्रकल्प व्यवस्थापक,   यांच्यासह बार्टी संस्थेतिल अधिकारी व कर्मचाऱी उपस्थित होते.

सुत्रसंचलन श्री रामदास लोखंडे यांनी केले.

आभार श्री विकास गायकवाड, सहा.प्रकल्प व्यवस्थापक  प्रकाशन व प्रसिद्धी  विभाग यांनी  मानले.

No comments:

Post a Comment

Pages