किनवट,दि.19 (प्रतिनिधी): राज्यात सगळीकडे पाऊस ओसरत असतांना किनवट तालुक्यात मात्र पावसाचा जोर कायम असून, तालुक्यातील नऊही मंडळात दमदार पाऊस पडलेला आहे. गत काही दिवसातील मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरावरील पिके बाधित झालेली आहे. सोमवारी (दि.18) सकाळी संपलेल्या 24 तासात तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस 326.8 मि.मी.झाला असून, त्याची सरासरी 36.31 मि.मी.आहे.
सोमवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 35.5 (675.1 मि.मी.); बोधडी- 35.5 (751.0 मि.मी.); इस्लापूर- 39.3 (835.0 मि.मी.); जलधरा- 24.5 (745.8 मि.मी.); शिवणी- 35.0 (704.3 मि.मी.); मांडवी-40.5 (486.0मि.मी.); दहेली-40.5(477.2 मि.मी.), सिंदगी मोहपूर 35.5(605.1 मि.मी.); उमरी बाजार 40.5 (513.8 मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 5,793.3 मि.मी.असून, त्याची सरासरी 643.7 मि.मी.येते. आजघडीला तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झालेला असून, सर्वात कमी दहेली मंडळात झालेला आहे. तालुक्यात सोमवार 18 जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 362.1 मि.मी.असून, या तुलनेत 177.76 टक्के पाऊस पडलेला आहे. 01 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळ्यातील चार महिन्यादरम्यान तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 951.90 मि.मी. असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 67.62 टक्के पाऊस पडलेला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत पडलेला पाऊस 489.40 मि.मी. होता. 30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत त्याची टक्केवारी 135.16 होती.
No comments:
Post a Comment