पुणे :
सन २०२२-२३ हे वर्ष समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी परीश्रम घेतले व दुर्बल घटकांना प्रगतीपथावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले अशा महान विभूती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. स्मृती वर्षाचे औधित्य साधून समाज कल्याण विभागाने वाचन प्रेरणा उपक्रमातुन अभिनव पध्द्तीने अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी त्यासंदर्भात नाशिक येथे माहिती दिली आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वत्तीने राज्यातील विभागाच्या अधिकारी यांच्यासाठी ३ दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. त्यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे ही उपस्थितीत होते, यावेळी त्यांनी वाचन प्रेरणा उपक्रमाची माहिती दिली.
विचारांची सुसंस्कृतता ही समृद्ध व दर्जेदार साहित्याचे वाचन केल्याने प्रगल्भ होत असते. वाचनाने मनावर सुसंस्कार होतात, विचारांना चालना मिळते, यामुळे समाजातील प्रत्येक घटकास वाचनासाठी प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे. यासाठीच वाचन प्रेरणा उपक्रमाची अंमलबजावणी मा.सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात जुलै २०२२ ते नोव्हेबर २०२२ या ५ महिन्याच्या कालावधीत सर्व शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहे, समाजमंदीरे या ठिकाणी वाचन प्रेरणा उपक्रम व वाचन स्पर्धाचे व्यापक आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण २३८८ अनुदानित वसतिगृहे, ४४१ शासकीय वसतिगृहे, १६५ अनु. जातीच्या आश्रम शाळा तसेच ९० शासकीय निवासी शाळा आहेत. त्याच प्रमाणे ६७६१८ इतक्या अनुसुचित जाती लोकवस्त्या आहेत. या सर्व ठिकाणी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी मुख्याध्यापक हे 'दप्तराविना शाळा" या उपक्रमांतर्गत "वाचू आनंदे" या तासिकेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वाचना साठी प्रेरणा देणार आहेत. तसेच वसतिगृह अधिक्षक हे देखील दर शनिवारी “बाबू आनंदे” या तासिकेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वाचना साठी प्रेरणा देणार आहेत.
जुलै २०२२ ते नोव्हेबर २०२२ या ५ महिन्याच्या कालावधीत प्रत्येक आठवड्यात आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालक व गावातील मान्यवर व्यक्ती यांची बैठक घेऊन वाचन उपक्रमाची माहिती देतील. तसेच 'एक व्यक्ती-एक पुस्तक भेट ही संकल्पना राबवून समाज सहभागातून पुस्तक पेढी समृध्द करण्यासाठी प्रतत्न करतील. प्रत्येक व्यक्तीने/ शिक्षकांनी /माजी विद्यार्थ्यांनी/ पालकांनी एका शाळेला विद्यार्थ्याच्या दयानुरूप पुस्तके भेट द्यावीत. वसतिगृहांत विद्यार्थी, पालक, मान्यवर व्यक्ती यांची बैठक घेऊन उपक्रम राबावावा. सहाय्यक आयुक्तांनी ज्या ठिकाणी समाज मंदिर आहेत त्याठिकाणी ठिकाणी लेखक/कवी/ प्रभावी पणे वाचन करणारी वाक्ती यांचे मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करावे
“पुस्तक आपल्या भेटीला” अंतर्गत परिसरातील चांगल्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन करणे. समतादूतांच्या मदतीने स्वताहून इच्छुक असणाऱ्या व्यक्तीची / विद्यार्थ्यांची वाचन प्रेरणादुत म्हणून नेमणुक करावी. वाचन प्रेरणा दुताच्या मदतीने चांगल्या पुस्तकांची माहिती तेथील घटकांना द्यावी.
शिक्षक /वसतिगृह अधिक्षक/ वाचन प्रेरणादुत यांनी संबंधित घटकांना प्रत्यक्षात प्रभावीपणे प्रकट वाचन करून दाखविणे. विद्यार्थ्यांचे प्रत्यक्षात वर्ग निहाय, गट निहाय वाचन घेऊन येणाऱ्या अडवणीचे निराकरण करावे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. वाचन प्रेरणा दुताने वाचनासाठी तेथील घटकांना प्रेरीत करावे.
शाळा/ वसतिगृह / समाज मंदीर इत्यादी मध्ये चांगल्या पुस्तकाबाबत चर्चा सत्राचे आयोजन करावे. शाळा व वसतिगृहातील सर्व विद्यार्थी तसेच समाज मंदीराच्या परिसरात राहणाऱ्या सर्व व्यक्ती चर्चा सत्रात सहभागी होतील या दृष्टीने प्रयत्न करावा. आठ्याच्या सुरुवातीला विद्याथ्यांना/व्यक्तींना एक पुस्तक द्यावे. आठवडयाच्या शेवटी (शनिवारी) त्याचा थोडक्यात सारांश संबंधितांना कथन करण्यास सांगणे, आठवयाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना/ व्यक्तीना एक पुस्तक द्यावे. दुसरा आठवड्याच्या शेवटी (शनिवारी) त्याचा थोडक्यात सारांश संबंधितांना परीसरातील लेखक कवींना शाळा /वसतिगृह/ समाज मंदीर इत्यादी मध्ये संवाद साधण्यासाठी निमंत्रीत करणे. काव्यसंग्रहावे ताल/लय/सूर इत्यादी नुसार वाचन प्रात्यक्षीकाचे आयोजन करणे, संबंधित घटकांकडून सराव करून घेणे मार्गदर्शन करणे. शाळा/वशतिगृह / समाज मंदीर इत्यादी मध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे. याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
शेवट्च्या टप्यात नोव्हेबर माहिन्यात विद्यार्थ्यासाठी विविध गटाच्या माध्यमातुन शाळास्तर / वसतिगृह स्तरावर तसेच तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच अश्या अभिनव पध्दतीने वाचन प्रेरणा उपक्रम राबवुन महापुरुषास अभिवाद्न करण्यात येत असल्याचेही डॉ.प्रशांत नारनवरे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment