शासन सदैव भारतीय जवान, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी - डॉ.अनंत गव्हाणे 23 वा कारगील विजय दिवस उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 July 2022

शासन सदैव भारतीय जवान, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी - डॉ.अनंत गव्हाणे 23 वा कारगील विजय दिवस उत्साहात साजरा

 औरंगाबाद, दिनांक 26 :  सर्व सेवेत श्रेष्ठ अशी सेवा म्हणजे देशसेवा आहे, ही सेवा भारतीय जवान मोठ्या हिमतीने करतात. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज दिली.

 जिल्हा सैनिक कार्यालयात 23 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. गव्हाणे बोलत होते. कार्यक्रमास पॉलिक्लिनिकचे प्रभारी मेजर सुभाष सासने, मेस्कोचे प्रादेशिक व्यवस्थापक कर्नल अविनाश काकडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती एस.फिरासत आदींसह माजी सैनिक, त्यांचे नातेवाईक आदींची उपस्थिती होती. 

 भारतीय जवान यांचा गौरवशाली इतिहास आहे. जवान, जवानांच्या कुटुंबियांचा, त्यांच्या त्यागाचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे डॉ.गव्हाणे म्हणाले. कारगील युद्धात वीरमरण प्राप्त शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच ज्यांनी कारगील विजयात मोलाचा वाटा उचलल्या जवानांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करत असल्याचेही ते म्हणाले. 

 शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मेजर सासने यांनी उपस्थितांना केले. काकडे यांनीही कारगील विजय दिवस याबाबत माहिती देत जवानांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन केले. 

विविध युद्धात वीरमरण आलेल्या जवानांच्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांना कार्यक्रमात गौरविण्यात आले. 

 शासनाच्या विविध योजनांचा लाभही शहीद कुटुंबातील नातेवाईक यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.  वीरमाता, वीरपत्नी, नातेवाईक आदींची कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले. आभार सहायक जिल्हा सैनिक अधिकारी विनायक आनाळकर मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 


No comments:

Post a Comment

Pages