स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलातील घड्याळी तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 July 2022

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलातील घड्याळी तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलातील घड्याळी तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी दिनांक २० जुलै २०२२ रोजी  समाजकार्य,अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयाच्या  मुलाखती मा. व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात  पार पडल्या सदर भरती प्रक्रियेत मा. संचालक, डॉ. घनश्याम येळणे यांनी मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल करून धनदांडगे, रोज घरची व वैयक्तिक दैनंदिन काम करणारे, राजकीय पाठबळ असणारे व ज्यांच्या मागील कार्यकाळात कुलसचिव कार्यालयात विद्यार्थीनींनी केलेल्या गंभीर स्वरूपाच्या लेखी तक्रारी असतांना सुध्दा अशा लोकांना संधी देणार असल्याची विद्यापीठ परिसरात चर्चा असल्याबाबत डॉ. नितिन गायकवाड यांनी विद्यापीठाच्या मा. कुलगुरूंकडे लेखी तक्रारीव्दारे केली आहे. तसेच डॉ. गायकवाड यांनी सदरील झालेली भरती प्रक्रिया तात्काळ थांबवून सामाजिकशास्त्रे संकुलातील मा. संचालक, डॉ. घनश्याम येळणे यांची एकाधिकारशाही व मुजोरी मोडित काढून ज्यांना कोणताही वसीला नाही तथा गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मा. कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे तक्रारीत कळविले आहे.



No comments:

Post a Comment

Pages