युवक काँग्रेस ही संघर्षाचं प्रतीक असून नेतृत्व घडवणारी संघटना आहे – अशोकराव चव्हाण ; महारक्तदान शिबिरात ११२३ रक्तदात्यांनी केले रक्तदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 15 July 2022

युवक काँग्रेस ही संघर्षाचं प्रतीक असून नेतृत्व घडवणारी संघटना आहे – अशोकराव चव्हाण ; महारक्तदान शिबिरात ११२३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 नांदेड जय भोसीकर :

    युवक काँग्रेस ही संघर्षाचं प्रतीक असून यातून युवा नेतृत्व घडतात. म्हणून मागील चाळीस वर्षांपासून ही चळवळ जपली आहे. असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ११२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

               युवक काँग्रेसच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून हजारोंच्या संख्येने युवक सहभागी झाले होते. याप्रसंगी बोलताना चव्हाण म्हणाले की, सद्यस्थितीत गावागावात युवक राजकारणात पुढे येत असून ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी या सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून येत आहेत. यापुढे पक्षही जो युवक तळागाळापर्यंत जाऊन लोकांची कामे करेल, निवडून येण्याची क्षमता ठेवेल अशा सक्षम असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेद्वाफी देण्याची पक्षाची भूमिका असेल. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत व आ. अमरनाथ राजूरकर यांनीही आपल्या भाषणात शिबिराच्या नियोजनाचे कौतुक करत युवक काँग्रेसने येत्या काळात अन्यायाविरुद्ध पेटून काम करण्याचे आवाहन केले. 

                 या शिबिरास आ. मोहन हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्री पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव बेटमोगरेकर, मंगाराणी अंबुलगेकर, सभागृह नेता महेश कनकदंडे, किशोर स्वामी, संजय लहानकर, मीनल खतगावकर, रेखा चव्हाण, सुरेंद्र घोडजकर, बालाजी पांडगळे, रवींद्र चव्हाण, जगदिश भोसीकर, विठ्ठल पाटील डक, विजय येवनकर, सुभाष रायबोले, संदीप सोनकांबळे, माधव कदम, किशन कल्याणकर, संतोष मुळे, श्याम कोकाटे, दीपक पाटील, राहुल हंबर्डे, नवल पोकर्णा, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

               कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक जिल्हाध्यक्ष तिरुपती कदम कोंढेकर व, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांच्यासह प्रवीण पोकर्णा, प्रदेश सरचिटणीस अतुल पेदेवाड, विधानसभा अध्यक्ष मारोती शंखतीर्थकार, विवेक राऊतखेडकर,  नितीन झरीकर, जनार्दन बिरादार, बापूसाहेब पाटील, अमोल केशवे, कमलाकर शिंदे, संतोष बोनलेवाड, ज्ञानेश्वर माने, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश यादव, सतीश बस्वदे, बालाजी शिंदे ,मदन देशमुख, दत्तू देशमुख, भालचंद्र पवळे, अमोल डोंगरे, सय्यद नौशाद, राहुल देशमुख, आदित्य देवडे, अझर कुरेशी, अजिंक्य पवार, जेसीका शिंदे, सुषमा थोरात, पिंटू पाटील आलेगावकर, रुद्रा पाटील, अनुप देशमुख, विजय सोंडारे, बाळू तिडके, संजय गोटमुखे, सचिन संत्रे, अभिजित हळदेकर, वैभव मठपती आदींनी परिश्रम केले.

No comments:

Post a Comment

Pages