बिलोली ( जय भोसीकर):
बिलोली शहरातील शौकत फंक्शन हॉल येथे संपन्न झालेल्या शहादते हुसेन ब्लडकँम्प मध्ये 103 रक्त दात्यांनी रक्तदान केले.सदरिल रक्तदान शिबिर बिलोली शहरातील उलेमा यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते.
रक्तदान शिबिराची सुरूवात देगलुरचे मुफ्ती सय्यद मुख्तारोदिन यांच्या उपस्थित संपन्न झाले. शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. दि क्रिसेंट ब्लड सेंटर नांदेड येथे सदरिल रक्त पिशवी दारिद्रय रेषेखालील रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मुफ्ती अय्युब खासमी,मौलाना मुबिन खॉन इशाअती,मुफ्ती सय्यद युनुस ,हफीज मोहम्मद,मौलाना जुबैर , हफीज मंसुर,रियाज सिद्दिकी, वलिओद्दीन फारुखी,अमजत चाऊस ,मिर्झा शौकत बेग ईनामदार, अहेमद खान , समिर पटेल, दि क्रिसेंट ब्लड सेंटर चे व्यवस्थापक मोहम्मद सिद्दिख , डॉ.कनकदंडे,संघरत्न सावतकर ,राजेश्री लोखंडे, शेख हुसेन माजिद , सह ब्लड सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते. ,सदर रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी रीयाज सिद्दीकी,वलिओद्दीन फारुखी,आणि सैफ पटेल फ्रेंडर्स क्लबचे पदाधिकार्यानी परिश्रम घेतले आहे.
No comments:
Post a Comment