वामनदादा हे आंबेडकर विचारांच चालतं बोलतं विद्यापीठ होत - प्रकाश कांबळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 August 2022

वामनदादा हे आंबेडकर विचारांच चालतं बोलतं विद्यापीठ होत - प्रकाश कांबळे

पूर्णा: वामनदादा कर्डक हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच चालतं बोलतं विद्यापीठ होत.त्यांनी कोणत्याही शाळेत जाऊन कोणतेही शिक्षण घेतले नाही,कोणतीही डिग्री मिळविली नाही,

परंतु आज अनेक अभ्यासक त्यांनी 

लिहिलेल्या गीतांवर डॉक्टरेट मिळवित आहेत.असे मत रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पूर्णा येथे 

पंचशील नाट्यग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.ते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत

पंय्यावंशजी होते तर विचार मंचावर माननीय श्रंगारपुतळे,बंडू गायकवाड, ॲड.

हिरानंनद गायकवाड,विजय गायकवाड,भुसारे, बोधाचार्य त्रिंबक कांबळे,अतुल गवळी आदि मान्यवर उपस्थित होते.

        प्रकाश कांबळे पुढे म्हणाले, वामनदादा कर्डक यांच्या गीतांना अनुभवांचा आधार होता.त्यांनी आयुष्य

जगताना गरिबीचे चटके सहन केले.विविध

प्रकारच्या वेदना सहन केल्या.जेंव्हा त्यांना

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्व कळले,तेंव्हापासून त्यांनी स्वतः ला

बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गाणी

लिहिली, गायली आणि समाजात मोठे

प्रबोधन घडवून आणले.त्यांच्या गितांचा

एक एक शब्द क्रांतीच्या ठिणग्याची पेरणी

करणारा ठरला.त्यांच्या लेखणीतून तयार

झालेले गीत मराठी साहित्यातील  

व्याकरणाविना लिहिले गेले,त्यात कोणतेही अवघड शास्त्र नसल्याने ते

सर्व सामान्यांच्या मनाला भिडले,आणि

प्रत्येकाच्या ओठावर खेळते झाले.एव्हढेच

काय त्यांनी आपल्या गीतातून लोकांना

माणुसकीचे धडे दिले.सर्व प्रकारच्या     

विषमतांवर प्रहार करीत समतेसाठी

गीत लिहिली,आणि त्यांचे आयुष्यभर

प्रबोधन केले.असेही प्रतिपादन त्यांनी

या प्रसंगी केले.

  "पैदा हो तो भीम सा नर पैदा हो!

एक नया आंबेडकर पैदा हो,

  सर झुकानेवाले तेरा सर क्या है,

सर मे तेरे भीम का सर पैदा हो!

वामनदादा कर्डकानी आपल्या गीतातून

व्यक्त केलेली भावना पूर्ण करण्यासाठी

समाजातील तरुणांनी त्यांच्या शताब्दी 

वर्षात संकल्प करावेत.असेही कांबळे

म्हणाले.

     

No comments:

Post a Comment

Pages