विद्यार्थ्यांनी स्वतंत्रसैनिकांचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान विसरू नये :- अभिजित जाधव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 August 2022

विद्यार्थ्यांनी स्वतंत्रसैनिकांचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान विसरू नये :- अभिजित जाधव

पुणे :

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त ताडिवाला रोड विभागतील प्रबुद्ध भारत प्रतिष्ठाण व धम्मचक्र यांच्या संयुक्त विद्यमाने मारुती मंदिर चौक या ठिकाणी  विद्यार्थी/विद्यार्थिनींना 1000 शालेय साहित्याचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारकांचे व भारतीय घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कधीही विसरू नये, या वेळी ताडिवाला रोड विभागतील २० तोळे सोने व दोन लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना २४ तासात आटक केल्या बद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल पवार, अमोल सरडे, सागर घोरपडे व टीम ( गुन्हे शाखा ) चा माझ्या व नागरिकांच्या हस्ते संविधान प्रत देऊन विशेष सत्कार करण्यात आला या वेळी पोलिस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, प्रबुद्ध भारत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ कांबळे, संघर्ष मोटधरे, अंकुश सूर्यवंशी, विशाल जंगले, व प्रदेश काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाचे उपाध्यक्ष सुजित यादव उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन धम्मचक्र प्रतिष्ठान चे आकाश सावंत, प्रमोद गायकवाड, विनय कदम, अमोल साळवे, राहुल सोनकांबळे, दिनेश बराथे, निलेश बोराडे, पप्पू गायकवाड,शिलरत्न सूर्यवंशी, आशिष शिंदे, सतीश गायकवाड, भूषण सुर्यवंशी, यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages