नांदेड , जय भोसीकर :
डिचपल्ली राज्य महामार्गावर तेलंगाना प्रदेशात अवैध मार्गाने सायाळ (साळींदर)जाती वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोन जणांना वनविभागाने व पोलिसांनी १६ आॕगस्ट रोजी सकाळी बिलोली येथील कल्याण टोल नाका येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून सायाळ जातीचे दोन मयत तर सहा जिवंत वन्य प्राणी जप्त करण्यात आले आहेत.
नरशी येथून बिलोली मार्ग तेलंगाना राज्यात वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच बिलोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिवाजी आण्णा डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय नगर कल्याण टोल नाक्यावर संशयित वाहनांची तपासणी केली असता वेगवेगळ्या आठ बारदाना मध्ये वन्य प्राणी असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केल्यानंतर हे सायाळ (साळींदर)असल्याचे सांगितले. आरोपी कडून आठ प्राणी तस्करीसाठी वापरलेली स्विफ्ट डिजायर कार (एपी १५ एपी ०६७८) व दोन मोबाईल जप्त करण्यात आले. आठ प्राण्यांपैकी दोन प्राणी मृत्यू झाले आहेत तर सहा प्राणी गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर बिलोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डाॕ.साई रामोड यांनी उपचार केले.
बिलोली पोलिस ठाण्यात वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंजनयुलू यादगिरी डोक्का (वय २२ वर्ष) रा.बेदन्नापल्ली ता.बेदन्नापल्ली जि.सिरसिला,श्रीनू राजय्या पावर्धम (वय २५ वर्ष) रा.दुबका ता.डुबका जि.सिध्दीपेट यांच्या विरूद्ध वन्यजीवन संरक्षण अधिनियम १९७२ (४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
देगलुर वनपरिक्षेञ अधिकारी निखिल हिवरे,बिलोली वनपरिक्षेञ मंडळ अधिकारी शेख फरिद,वनरक्षक माणिक गुरूपवार,वनरक्षक गिरिश कुरूडे,वनरक्षक ज्ञानेश्वर मुसळे,मजुर शेषेराव इंगळे,साईनाथ ठक्करोड,गायकवाड सुनिल,लक्ष्मण इबितवार,प्रकाश कांबळे,लक्ष्मण गंगुलवार,मुन्ना रुमाले यांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment