किनवट तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित सरपंचांची होणार थेट निवड; 18 सप्टेंबरला होणार मतदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 18 August 2022

किनवट तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित सरपंचांची होणार थेट निवड; 18 सप्टेंबरला होणार मतदान

किनवट, दि.16 ,पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच 608 ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून, यात किनवट तालुक्यातील जानेवारी 2021 ते  मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या 47 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सरपंचांची निवड आता थेट ग्रामस्थांमधून होणार आहे.  18 सप्टेंबर रोजी मतदान, तर 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असल्यामुळे, तालुक्यातील निवडणुकीच्या गावात इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झालेली आहे.


     स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेण्याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार जेथे पाऊस कमी आहे, अशा ठिकाणच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी नोटीस प्रसिद्ध होईल. 24 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर या कालावधीत नामांकनपत्र दाखल करता येईल. दरम्यान 27 ला शनिवार,28 ला रविवार आणि 31 ऑगस्टला श्रीगणेशचतुर्थीची रोजी सुटी असल्यामुळे, या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाही. 02 सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. 06 सप्टेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून, 06 सप्टेंबरलाच दुपारी तीनच्या नंतर निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान होईल.


     किनवट तालुक्यातील मुदत संपलेल्या 47 ग्रामपंचायचीमध्ये निवडणूक होणार गावे पुढील प्रमाणे : 1. डोंगरगाव 2. चिंचखेड 3. घोटी 4. धानोरा सी. 5. पाथरी 6. प्रधानसांगवी 7. मांडवी 8. परोटी 9. उमरी बाजार 10. कुपटी खुर्द 11. लोणी 12. नागापूर 13. सिरपूर 14. थारा 15. आमडी 16 कनकवाडी 17. येंदापेंदा 18 सिंगारवाडी 19 कमठाला 20 मोहपूर 21 सिंदगी मोहपूर 22. गोकुंदा 23. मांडवा कि. 24. बोधडी बुद्रुक 25. दिग्रस 26. माळबोरगाव 27. नागझरी 28. सावरगाव 29. गौरी 30.जलधरा 31. राजगड 32. तल्हारी 33. आंदबोरी चिखली 34. कोपरा 35. कोठारी सी. 36. सावरी 37. सक्रुनाईक तांडा 38. वझरा बुद्रुक 39. कनकी 40. जवरला 41. कोल्हारी 42. निचपूर 43. राजगड तांडा 44. पिंपळगाव सी. 45. सिंगोडा 46. मानसिंगनाईक तांडा 47. निराळा तांडा.

No comments:

Post a Comment

Pages