शिक्षणाचा बाजार मांडणा-या संस्थेची मान्यता रद्द करून चालकावर गुन्हा नोंदवा - पालकांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 25 August 2022

शिक्षणाचा बाजार मांडणा-या संस्थेची मान्यता रद्द करून चालकावर गुन्हा नोंदवा - पालकांची मागणी

 किनवट: १३हजार रुपये प्रवेश शुल्क भरून प्रवेश घ्या, प्रशिक्षण घेण्याची गरज नाही,परीक्षाही नाममात्रच होईल व एका वर्षानंतर पदविका प्रमाणपत्र तुमच्या हाती देण्यात येईल,असा शिक्षणाचा बाजार मांडण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून गोकुंदा(ता किनवट)येथे कार्यालय असलेल्या गोपीनाथ मुंडे आय.टी.आय.प्रशिक्षण संस्थेने मांडला आहे.फक्त कागदोपत्री प्रशिक्षित प्रशिक्षणार्थि विद्यार्थी तयार करून एकप्रकारे शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सदरील संस्थेची मान्यता संबंधितांनी रद्द करून संस्था चालकांना कोठडीची हवा दाखवावी,अशी मागणी किनवट या आदिवासी तालुक्यातील अनेक जागृत पालकांनी केली आहे.      गोपीनाथ मुंडे आय.टी.आय.प्रशिक्षण संस्थेमार्फत गोकुंदा येथे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर चालविण्यात येते.या सेंटरमध्ये १० वी व १२वी पास विद्यार्थ्यांसाठी पुर्णवेळ असलेला एक वर्षाचा वायरमन - प्रवेश क्षमता २५ व बांधकाम पर्यवेक्षक - प्रवेश क्षमता ५०, असे दोन मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम आहेत.     या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुल्क घेऊन प्रवेश देण्यात येतो.यानंतर मात्र त्यांना प्रशिक्षित पुर्ण करण्याची गरज नसते.क्रमिक पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येतात.त्याचा अभ्यास त्यांनी वर्षभर घरी राहूनच करावा.नंतर शासकीय आय.टी.आय.मध्ये वार्षिक परिक्षा होते.परंतु, या परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही,परीक्षा या अर्थपुर्ण व्यवहारातून मेनेज केल्या जातात, असे विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत सांगीतल्या जाते,हे विशेष आहे.     राज्यातील बहुजन समाजाचे शक्तीशाली नेते राहीलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या नावे असलेल्या प्रशिक्षण संस्थेतून बहुजन विद्यार्थ्यांना बोगस प्रशिक्षण देऊन त्यांची व शासनाची फसवणूक करणाऱ्या संस्था चालकाबदल वंजारी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.ही बाब आपण पंकजा मुंडे यांच्या कानावर घालणार असल्याचे समाजाच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितले.   या प्रकरणी संस्था चालकाकडून अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता.

No comments:

Post a Comment

Pages