दलित अन्याय विरोधात जातियतेचा मटके फोड आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 19 August 2022

दलित अन्याय विरोधात जातियतेचा मटके फोड आंदोलन

सोलापूर,दि.१९ ऑगस्ट-सध्या देशभरात दलितांवर होणारे अन्याय अत्याचार यांच्या विरोधात सर्वपक्षीय दलित अन्याय अत्याचार विरोधी युवा संघटन च्या वतीने चातुरवर्णाचा प्रतिकृती मटका फोड आंदोलन करण्यात आले. युवा पॅंथर सामाजिक संघटनेचे आतिश बनसोडे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत या मटके फोड आंदोलनामध्ये सर्व युवक शामील झाले होते. प्रारंभी जातीवादी मानसिकतेचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. नंतर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा चातुर्णाचा आणि जातियतेचा मटका छ.शिवाजी महाराज,क्रांतीबा फुले,छ.शाहू महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,आहिल्यादेवी होळकर, आण्णांभाऊ साठेंचा जयघोष करीत सदर मटके फोडून संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला. संपूर्ण देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना दलितांवर होणारे अन्याय अत्याचार हे भारत देश स्वतंत्र झाला तरी कधी थांबणार?

तसेच काल झालेल्या औरंगाबाद पिसादेवी येथे जमिनीच्या वादावरून मातंग समाजाचे जनार्दन कसारे यांची कुऱ्हाड घालून हत्या करण्यात आली त्या विरोधात हे आंदोलन असल्याचे युवा पॅंथरचे आतिश बनसोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी 

जेष्ठ कार्यकर्ते ब्रम्हाजी निकंबे,राष्ट्रवादी विद्यार्थी चे युवा नेते सागर शितोळे,निशांत सावळे,श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे अजिंक्य पाटील,सत्यशोधक चे स्वप्नील व्हटकर,रिपाई युवक शहराध्यक्ष सुमित शिवशरण,युवा पँथरचे आकाश चंदनशिवे,राहूल शिंदे,सुकांत वी,प्रदिप बाबरे,वैभव सरवदे,अजिंक्य सोनकांबळे,पॅन्थर.आभिषेक शिंगे सिद्धु काळे,ओंकार खटावकर,पद्मसिंह शिंदे,रूषी घोलप,रत्नदिप रणदिवे,आण्णा भालेराव,पी.सुतकर सर,अमोल के,चांद सुरवसे,चिंटू निकंबे,रोहन बनसोडे,विशाल शिंगे, शुभम नागटिळक,आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages