लोक अदालतीत तीन हजार 105 प्रकरणांमध्ये तडजोड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 19 August 2022

लोक अदालतीत तीन हजार 105 प्रकरणांमध्ये तडजोड

 औरंगाबाद, दिनांक 19  : राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण एक हजार 548 प्रलंबित,  एक हजार 557 दाखलपूर्व असे एकूण तीन हजार 105 प्रकरणांमध्ये तडजोड झाली. प्रलंबित प्रकरणांमध्ये 37 कोटी 44 लाख 23 हजार 305 व वादपूर्व प्रकरणांमध्ये एकूण पाच कोटी 30 लाख 18 हजार 961 अशा एकूण 42 कोटी 74 लाख 42 हजार 266 रूपयांची प्रकरणे अदालतीत तडजोडीने मिटल्याचे  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कळविले आहे.

 जिल्हा  विधी सेवा प्राधिकरण व  जिल्हा सत्र न्यायालय येथे प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांसाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा  प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय अधिकारी, विद्युत कंपनीचे, वित्तीय संस्था, वकील व बँकेचे अधिकारी यांच्यासमवेत अदालत यशस्वीतेसाठी विविध बैठकाही पार पडल्या. 

 कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन अदालतीत करण्यात आले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संतोष पाथी्रकर, सचिव ॲड. अशोक मुळे, सत्र न्यायालयाचे अधीक्षक एस.जी.कुंदे आदींसह  न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, वकील संघाचे सभासद आदींचा अदालतीत उत्स्फूर्त सहभाग असल्याचेही प्रधिकरणाने कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Pages