नांदेडचे जिल्हाधिकारी आता नाग भूमीत..डॉ विपीन यांची बदली नागपूरला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 18 August 2022

नांदेडचे जिल्हाधिकारी आता नाग भूमीत..डॉ विपीन यांची बदली नागपूरला


नांदेड ,जय भोसीकर :

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची बदली नागपूर येथे झाली असून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नागपूर या पदावर करण्यात आल्याचे आदेश दि.18 ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुबंई यांनी काढले. नागपूरचे जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर. यांच्या ठिकाणी डॉ.विपीन इटनकर यांची बदली झाली आहे..सध्याचा कार्यभार विभागीय आयुक्त औरंगाबाद.यांच्या सल्याने अन्य अधिकाऱ्या कडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्विकारावा असे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी दिले आहेत..डॉ.विपीन यांनी नांदेड जिल्हाधिकारी म्हणून 17 फेब्रु 2020 ला कार्यभार स्वीकारला होता..कोरोना च्या बिकट परिस्थिती च्या काळात उल्लेखनिय काम त्यांनी केलं होत..काटेकोर नियोजन ,कार्य तत्पर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे..अलीकडेच त्यांनी सेजल बकश या तृतीयपंथीयाला सेतू सुविधा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयात चालू करून दिले..दुर्लक्षित घटक मुख्य प्रवाहात त्यांनी आणलं..

शेतकरी वर्ग ,बचत गट, छोटे उदयोग यांना वाव भेटावा यासाठी त्यांनी रान भाजी  महोत्सव त्यांनी भरवल होत..धडाकेबाज अधिकारी ते आहेत..त्यांची बदली नागपूर ला झाल्याने ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माय भूमीत ते गेले आहेत..अशा चर्चाना उधाण आलं आहे. डॉ इटनकर लोकप्रिय जिल्हाधिकारी असल्या कारणाने सोशल मीडियावर त्यांच्या बदली चे आदेश व वॉट्सअप ,वॉट्सअप स्टेट्स फेसबुक वर चांगलेच फिरत होते.

No comments:

Post a Comment

Pages