मुंबई दि. २२ जय भोसीकर - ओला दुष्काळ जाहीर करा... अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा... पन्नास खोके, माजलेत बोके... पन्नास खोके, एकदम ओके... ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी... स्थगिती सरकार हाय हाय... गद्दारांचं सरकार हाय हाय!!!... आले रे आले गद्दार आले... अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी ईडी सरकारला धारेवर धरण्याचे काम सुरू केले असून हे आंदोलनातून दाखवून दिले आहे.
No comments:
Post a Comment