औरंगाबाद ,22:
सोयगाव येथील मधुकर संपत पगारे ह्यांना दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेअंतर्गत मिळालेल्या शेतजमिनीत अतिक्रमण झाल्याने अतिक्रमनाला काही अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने पीडित शेतकऱ्यांनी ह्या विरोधात रिपब्लिकन सेनेचे पूर्व जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धोधन मोरे ह्यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते.
15 दिवसांच्या आत शेतजमीनीवरील अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी ह्यांनी दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत रुपेकर ( मराठवाडा उपाध्यक्ष),सिध्दोधन मोरे जिल्हा प्रमूख (पुर्व) मा काकासाहेब गायकवाड जिल्हा प्रमुख (पश्चिम).मिलिंद बनसोडे (शहर अध्यक्ष), मा.सचिन निकम ( रि. वि.सेना मराठवाडा अध्यक्ष) मा राहुल कानाडे जिल्हा प्रमुख युवा ,मा.विकास हिवराळे ( जिल्हा उपाध्यक्ष पुर्व), मा. विकास गायकवाड ( जिल्हा उपाध्यक्ष पुर्व), मा. सचिन शिंगाडे ( जिल्हा उपाध्यक्ष पुर्व), रामराव नरवडे जिल्हा सचीव बबन साठे जिल्हा उपाध्यक्ष मा.अक्सर खान शहर सचीव , मा.शेषराव दाणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment