ध्वजसंहिता २००२' व 'राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१' चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे - लोकस्वराज्य आंदोलनाची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 12 August 2022

ध्वजसंहिता २००२' व 'राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१' चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे - लोकस्वराज्य आंदोलनाची मागणी

नांदेड :

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या 'हर घर तिरंगा' अभियाना दरम्यान नागरीकांनी 'ध्वजसंहिता २००२' व 'राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१' चे काटेकोरपणे पालन करण्याबाबत दिशानिर्देश देण्याबाबतचे लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले असुन.यावेळी निवेदनात 'ध्वज संहितेच्या भाग III च्या कलम IX मध्ये नमूद केल्यानुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल इत्यादी मान्यवरांशिवाय कोणत्याही वाहनावर ध्वज फडकवू नये.' असे स्पष्ट निर्देश असतांना काही नागरीक चारचाकी वाहनांवर व चक्क अॅटोवर राष्ट्रध्वज लावत असल्याचे निदर्शनास येत असुन अशा प्रकारामुळे ध्वजसंहीतेची पायमल्ली होत आहे.अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी व राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी घरावर राष्ट्रध्वज फडकविण्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर राष्ट्रध्वज फडकविण्यास पायबंद घालण्यासाठी

व नागरिकांनी 'ध्वजसंहिता २००२' व 'राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१' चे काटेकोरपणे  पालन करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले.यावेळी निवेदनावर निवृत्ती पिराजी गायकवाड,गोपाळ ग्यानू वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी होत्या.

No comments:

Post a Comment

Pages