फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूरच्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेची पथनाट्याद्वारे जनजागृती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 12 August 2022

फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूरच्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेची पथनाट्याद्वारे जनजागृती

नांदेड दि. :  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव २०२२ निमित्य

प्रादेशिक परिवहन कार्यालय , नांदेड आणि फकीरा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था बळीरामपुर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड  येथे  दि. १० आॅगष्ट २०२२ रोजी ‘निळ्या आकाशातील लाल वादळ’ या कलापथका तर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त घर घर तिरंगा मोहीम निमित्य पथनाट्याव्दारे जनजागृती करण्यात आले.

  प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे हर घर तिरंगा व रस्ता सुरक्षा पथनाट्य कार्यक्रमाचे उदघाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेशजी कामत यांच्या हस्ते करण्यात आले,तर प्रमुख उपस्थितीमध्ये अविनाश राऊत (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी),संदिप निमसे (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ), किशोर भोसले (मोटार वाहन निरीक्षक),राजेश गाजुलवाड (मुख्य लिपिक),जयश्री वाघमारे (वरिष्ठ लिपीक) आदीची प्रमुख उपस्थिती होती.

संपूर्ण भारत देशामध्ये 

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार १३ आॅगष्ट  ते १५ आॅगष्ट २०२२ पर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा लावुन व घरासमोर रांगोळ काढून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा व या ऐतिहासिक आनंदी सोहळ्याचा साक्षीदार व्हावे असे पथनाट्य सादरीकरणातून जनजागृती व आवाहन करण्यात आले असुन,यावेळी कलापथकातील कलाकारांच्या साहाय्याने हर घर तिरंगा व रस्ता सुरक्षा मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे फकीरा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष तेलंग यांनी सांगितले.

हर घर तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी निळ्या आकाशातील लाल वादळ या संचाचे प्रमुख व मुख्य गायक माधव वाघमारे, प्रसिद्ध गायिका सविता गोदाम, गणेश गोदाम,दत्ता पोटलेवाड,अधिराज वाघमारे,सुरज गायकवाड,दिपक बोरीकर,सारीका तपासकर,विनोद तेलंग,बंडू वाघमारे,शेषेराव झुंजारे,नितीन कवडे,दिलीप वाव्हळे,आदी कलावंताचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सुर्यवंशी यांनी केले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी फकिरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मानद सचिव साईप्रसाद जळपतराव,उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड आदीसह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages