औरंगाबाद :
दैनिक लोकमतमध्ये प्रदिर्घ काळ पत्रकार व संपादक राहिलेले श्रीकांत भराडे यांचे दि.२ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री सव्वा आठ वाजता निधन झाले आहे,त्यांचे लहान बंधू अरविंद भराडे यांच्याकडून ही दुख्खद वार्ता कळाली.
चमकधमक असलेल्या पत्रकार क्षेत्रात राहूनही अत्यंत निगर्वी,साधेपणा श्रीकांतजींनी जपला होता.लोकमतचे कार्यकारी संपादक महावीरभाई जोंधळे यांच्या मुळे माझी आणि श्रीकांतजींची ओळख झाली.कवी, ललित व वैचारिक लेखकाचा त्यांचा पिंड होता.दैनिक लोकमतमध्ये 'पाय हरवलेली माणसं ' हे सदर त्यांनी चालवले.त्याला रेखाटने करण्याची संधी मला मिळाली.त्यामुळे त्यांचा सहवास लाभला.पुढे त्याचे रूपांतर मैत्रीत कधी झाले कळाले नाही.
लोकमतच्या ग्लॅमरचा व्यक्तिगत फायदा त्यांनी कधीच घेतला नाही.अलिकडे आमच्या भेटीगाठी विरळ झाल्या होत्या.अरविंदजीच्या भेटी होत होत्या.त्यातून त्यांचे क्षेमकुशल कळत होते.आणि आता अचानक अरविंद भराडे यांचा मॅसेज आला.खात्री पटावी म्हणून मी त्यांना फोन केला.वार्ता खोटी निघावी असं मनोमन वाटत होतं.परंतू आठ दिवसांपूर्वी त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे ऊशिरा निदान झाले.आणि कॅन्सर ने त्यांना अखेर आपल्यातून हिरावून नेले. अंत्यविधी परभणी येथे उद्या ३ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजता खंडोबा स्मशानभूमीत होणार आहे.
No comments:
Post a Comment