औरंगाबाद, दि. 03 : देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्ष होत आहेत. आझादी का अमृत महोत्सव कार्याक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी स्वराज्य सामुहीक राष्ट्रगीत गायन 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा याबरोबरच सैन्यभरतीची अग्नीवीर सुरवात केली जाणार आहे. या दोन्ही उपक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व सैन्यभरतीसाठी तरुण सहाभागी होणार असून या उपक्रमाच्य यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनाबरोबर समाजातील विविध सामाजिक संस्था, उद्योजक, व्यवसायिकांनी नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बैठकीत केले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत तसेच या उपक्रमाचे नोडल अधिकारी रामेश्वर रोडगे, ज्योती पवार, एम.के. देशमुख, जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.घुगे, एमआयडीसाचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी यांच्यासह राजेश जोंधळे, भद्रा मारोती संस्थान प्रतिनिधी गुरुद्वार समिती व्यवस्थापानाचे हरविंद बिद्रां, पेट्रोलपंप असोशिएनचे जयसिंग रंधवा, उद्योजक राम भोगले, रोटरी क्लबचे दिपक पवार, अजित जैन, शिवाजी पाटील, मनोज पाडाळकर, दुष्यंत पाटील, तनसुख झांबड, चिरंजीवी लाला बजाज, प्रल्हाद राठोड, मिठू राठोड, नरेश बोथरा, यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वातंत्र्य लढ्यासाठी जीवनाचे बलीदान दिलेल्या राष्ट्रभक्त व जवानांच्या प्रति आभार व राष्ट्रप्रेम व्यक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवित आहेत. यात ‘स्वराज्य’ सामुहीक राष्ट्रगीत गायन 9 ऑगस्ट रोजी गारखेडा परिसरातील स्टेडियममध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम होणारअसून यात विविध राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होईल. तसेच 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट मध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांमध्ये प्रत्येक कार्यालय,आणि घरावर फडकवण्यात येणार आहे. घरावरील राष्ट्रध्वज उतरवण्याची आवश्यकता नसून सुर्यास्तानंतर शासकीय कार्यालय, आस्थपणा, दुकाने यावरील राष्ट्रध्वज उतरवण्या बाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याचबरोबर औरंगाबाद येथे सात जिल्ह्यातून सैन्य भरतीसाठी विविध जिल्ह्यातून तरुण येणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या क्रीडागणांवर सैन्य भरतीची प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक दिवशी सहा हजार तरुणांच्या पाणी, नाश्ता, स्वच्छतागृह तसेच वाहतूक बस व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विविध समाजातील सामाजिक संस्थाच्या सहाकार्याने सैन्यभरतीस उमेदवारास सेवा सुविधा देण्यासाठी नागरिकांची मदत लागणार आहे. त्या मदतीसाठी समन्वयन अधिकारी यांची जिल्हा प्रशासनाने नियुक्ती केली आहे. राष्ट्रकार्यात जाणाऱ्या सैन्यभरतीस येणाऱ्या तरुणांना मदत करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विविध प्रतिष्ठित नागरिक सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी समाजसेवक व धर्मगुरु यांना याबैठकीत केले. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या अवाहनास सर्वच संस्थानी मदत करण्याचे अश्वासनचा बैठकीत जिल्हा प्रशासनास दिले.
No comments:
Post a Comment