नांदेड , जयवर्धन भोसीकर (विशेष प्रतिनिधी):
लोककवी भीमकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळा निमित्त दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे गीत वामनाचे हा प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे. वामनदादाच्या हयातीत हजारो गीते लिहिल्या गेली, त्यातील काही निवडक बुद्ध भीम गीतांचे सादरीकरण यावेळी प्रा. अविनाश नाईक प्रस्तुत मिशन ए भीमक्रांती या संगीत संचाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनंत राऊत ,उद्घाटक दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन ,सत्कारमूर्ती भारती रघुनाथ तलवारे ह्या जीवन गौरव पुरस्कार स्वीकारतील, प्रमुख अतिथी सुरेश गायकवाड ,किशोर भवरे ,प्रा. रवींद्र हडसनकर ,गोविंद नांदेड माजी शिक्षण संचालक ,एकनाथ उर्फ अनिल मोरे माजी सचिव ग्रामविकास ,,बाळू भाऊ राऊत, ज्योती कल्याणकर ,विलास जंगले ,मारुती कवळे गुरुजी पाटील ,इंजिनिअर मादळे बी एम, इंजि.प्रकाश नगारे ,सारंग साळवी मिलिंद चावरे दत्ता गायकवाड आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होईल.
गायन वादनाच्या माध्यमातून माननीय वामनदादा कर्डक यांच्या समवेत झोपडी झोपडी डॉ. बाबासाहेबांचे विचार पेरण्याचे काम करून समाजप्रबोधन करणाऱ्या एक 225 पेक्षा अधिक मढी जागून समाजकार्य करणारे कालवश रघुनाथ भुजंग तलवारे यांना मरणोप्रांथ आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून दुसरा लोककवी भीम कवी वामनदादा कर्डक पुरस्कार 2022 प्रदान केल्या जाईल ,असे मयुरी अविनाश नाईक यांनी स्पष्ट केले .या कार्यक्रमात सर्व बुद्धिजीवी पालक विद्यार्थी व तरुणांनी उपस्थित राहून वामनदादाच्या अनमोल गीतांच्या प्रबोधनाच्या सादरीकरणाचा लाभ घ्यावा ही विनंती या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती मयुरी अविनाश नाईक यांची असून निर्मिती सहाय्यक प्रा. अविनाश नाईक यांच्या आहे .या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण शिल्पा प्रसाद मालंडकर मुंबई या असून त्यांच्या आवाजात दादांची गीते ऐकवायला मिळणार आहे .तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
No comments:
Post a Comment