नांदेड, (प्रतिनिधी ) - नांदेड येथे येत्या 28 ऑगस्ट रोजी महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात कालवश प्रतापसिंग बोदडे विचारमंचावर सकाळी 11 वाजल्यापासून जन्मशताब्दी महोत्सवाला सुरुवात होणार आहे. सेवानिवृत्त प्राचार्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबाराव नरवाडे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीप्रित्यर्थ सातत्याने गेल्या १७ वर्षापासून मुख्य संयोजक संजय निवडंगे नांदेडकरांना आगळी-वेगळी सांस्कृतिक मेजवानी देत असतात. यावर्षी जन्मशताब्दी वर्ष असल्याने या कार्यक्रमाचे वेगळेपण जपले जाणार आहे. जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंबेडकरी चळवळीतले आघाडीचे कार्यकर्ते सदाशिव सितळकर भूषविणार आहेत. या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले उपस्थितांचे स्वागत करणार आहेत.
महोत्सवात व्याख्यान, शाहिरी, गायन आणि पत्रकारिता तसेच आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कार्य करणार्या कार्यकर्त्यांचा ‘तुफानातील दिवे’ पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवात प्रा. रविचंद्र हडसनकर, डॉ. राजेंद्र गोणारकर, प्रा.डॉ. जे.टी.जाधव, विजय कांबळे, जे.के. जोंधळे, रेखाताई पंडीत, सा.ना. भालेराव, माधवदादा जमदाडे, भीम पवार, दत्तूकाका वाघमारे, इंजि.डी.डी. भालेराव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
एम. सायलूदादा म्हैसेकर, बालाजी इबितदार, डॉ. रवि सरोदे, डॉ. अनंत सूर्यवंशी, एच.पी. कांबळे, डॉ. दिलीप कंधारे, सदानंद अंभोरे, डॉ. कैलाश धुळे आदी नांदेडच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.
पत्रकारिता पुरस्कार
महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाच्या औचित्याने संयोजन समितीने यावर्षीपासून पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाकवी वामनदादा कर्डक पत्रकारिता पुरस्कार’ देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार समितीच्यावतीने सन २०२१-२२ चे पुरस्कार ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार जी.पी.मिसाळे, मराठी नाऊ चॅनलचे इंजि. प्रविण खंदारे, दैनिक सत्यप्रभा या वृत्तपत्राचे उपसंपादक मिलिंद दिवेकर आणि महाराष्ट्र न्युज लाइव्ह चॅनलचे संघरत्न पवार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
'तुफानातले दिवे' पुरस्कार
आंबेडकरी चळवळीत झोकून देणार्या कार्यकर्त्यांचा या जन्मशताब्दी महोत्सवामध्ये समितीतर्फे ‘तुफानातले दिवे पुरस्कार’ देवून गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येणार्या कार्यकर्त्यांमध्ये मायाताई प्रतापसिंग बोदडे, धुरपताबाई भोरगे, केशरबाई गोटमुखे, सुभद्राबाई भालेराव, गोदावरीताई सत्यजित चिखलीकर, रमेशबाबू वाघमारे, मिलिंद दाभाडे, किशन बळीराम ठमके, प्राचार्य अशोक जाधव, बी.डी. कांबळे यांचा समावेश आहे.
दिग्गज गायकांचा सांस्कृतिक कार्यक्रम
वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवात महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रप्रदेशातील नामवंत गायक आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये वामनदादांचे पट्टशिष्य सुप्रसिध्द गायक नागसेन सावदेकर, मनोज राजा गोसावी, कुणाल वराळे, अशोक निकाळजे, मेघानंद जाधव, किशोर वाघ, ललकार बाबू, चेतन चोपडे, अजय देहाडे, देवा अंभोरे, सपना खरात, धम्मा शिरसाट, विजय मांडकेकर, रविराज भद्रे, माधव वाढवे, गौतम पवार, अंजली घोडके, अ्रंजली गडपाळे, बबन दिपके, अशोक चवरे, संगीता पवार, राहुल वाघमारे, किशन मंत्री आदी सहभागी होणार आहेत. सुप्रसिध्द संगीत संयोजक - शुध्दोदन कदम आणि त्यांचा संच या कलावंतांना साथसंगत करणार आहेत, अशी माहिती महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीचे मुख्य संयोजक संजय निवडंगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
No comments:
Post a Comment