नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची बदली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 30 August 2022

नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची बदली


नांदेड दि 30 :- महाराष्ट्र राज्यामध्ये  महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे शिवसेना गट -भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये  सरकार स्थापन झाले असून त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये  शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या  जोरात सुरू आहेत.  काही दिवसांपूर्वी नांदेडचे माजी जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांची बदली  झाली होती. त्यानंतर आता नांदेड-वाघाला महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची बदली शासनाकडून करण्यात आली असून यांच्या जागी नव्या आयुक्त म्हणून तृप्ती सांडभोर असणार आहेत.


पनवेल महापालिका येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या तृप्ती सांडभोर यांचे नांदेड वाघाला मनपा आयुक्त म्हणून शासनाने आदेश मंगळवार दि. 30 रोजी सायंकाळी उशिरा काढले, तर डॉ. सुनील लहाने हे परभणी आयुक्त म्हणून बदलीने जाणार आहेत.


दहा दिवसांपूर्वी नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या बदली झाली होती. त्यानंतर मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या बदलीच्या आदेशाने नांदेडकरांना  पुन्हा धक्का बसला आहे.

 या दोन्हीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोरोना काळामध्ये योग्य नियोजन आखत कोरोना संसर्गाला आळा बसवला होता. त्यामुळे एका पाठोपाठ एक  बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या  बदल्या केल्यामुळे ते राजकीय शिलेदारांचे बळी ठरत आहेत की काय अश्या   नांदेड जिल्ह्यामध्ये  उलट सुलट चर्चांना उधान आल आहे.


No comments:

Post a Comment

Pages