नांदेड दि. 30 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडीया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टँडई-2020/प्र.क्र.23/अजाक,9 डिसेंबर 2020 अन्वये निश्चित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्हयातील इच्छूक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक पी. जी. खानसोळे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
Tuesday 30 August 2022
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment