बिलोली ,जय भोसीकर :
सगरोळी पासून 5 कि. मी. अंतरावर असलेल्या कार्ला बु. येथील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उस्ताहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहन सरपंच सौ. खेळगे शिल्पा शिवराज यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रबोधनकार श्री नामेवार एन.जी. श्री राजेश मनुरे उपसरपंच माचनूर, भालेराव गौतम, शंकर माळगे इंजिनियर, हे होते. या वेळी जयंती मंडळाच्या वतीने गरजू मुलां व मुलींना शैक्षणिक साहित्य [ पेन वह्या ] वाटप करण्यात आली. क्रमांक मिळविल्याबद्दल या विध्यार्थीनीचे यथोचित सत्कार करण्यात आले. येथील अक्षरा बरबरडे हिचा सन्मान करण्यात आला. सार्वजनिक समाज मंदिर येथे मुक्ता साळवे अभ्यासिका केंद्राचे उद्धाघाटन देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या शुभ हस्ते झाले. यावे कार्यक्रमात श्री हाणमंत मिणके ग्रा.सदस्य, शिवराज बरबरडे जि.प. शिक्षक, मुकिंदर कुडके सामाजिक कार्यकर्ता बिलोली, मनोज भानुदास, शंकर कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष, सौ.मनीषा शंकर जेठे ग्रा.प. सदस्य, सौ.नसरीन पिंजारी, श्री मारोती कांबळे, मारोती बायनोर, मोहन कासेवार,सुलचना तोंदरे, सौ. महादाबाई मठपती आदी उपस्थितीत होती. यावेळी कार्ला बु.चे ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक पञकार बांधव व महिला मोठ्या संख्येने युवा तरुण मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम शिक्षक श्री शंकर जेठे यांनी पुढाकार घेऊन यशस्वी केले.

No comments:
Post a Comment