नांदेड जय भोसीकर :
राष्ट्रीय कलाल गौड समाज युवा संघर्ष समितीच्या वतीने कलाल समाजाचे आराध्य दैवत सरदार सरोवई पापन्ना गौड यांची 372 वी जयंती शासकीय विश्रामगृह मधील मिनी सहयाद्री सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाराव पाटील अंदबोरीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद पाटील कोंडलवार, कैलास गोडसे ,दत्तात्रय अनंतवार,रमेश कोंडलवार,आंनदराव घंटलवार,रामेश्वर गोडसे,विठ्ठल पाटील पडलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून सर्वाना परिचित असलेले माहिती अधिकार तपास समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.दत्तात्रय पांडुरंग अनंतवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा ही साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये गंगाधर नंदेवाड,कॉ उज्वला पडलवार ,नागनाथ पाटील कोंडलवार,बालाजी सुंदरगीरवार ,गणेश नंदेवार,बाबाराव नंदेवार,सुधीर बुरेवार,अविनाश घंटलवार,संदीप बिलोलीकर,पांडुरंग पाटील,नितीन कन्नलवार,राम अनंतवार, संदीप बिलोलीकर,प्रमोद भुरेवार, हिराचंद भुरेवार,विजय बत्तीनवार,संजय सुद्धनवार,ज्ञानेश्वर ईबीतवार, सुनील रेटेवार, रामेश्वर पाकलवार,माणिकराव बुरेवार,रामदास रायपलवार ,रवी कन्नलवार,बालाजी रायपलवार,सुरेश अनंतवार,राजू पंजाला,गणेश आलेवार, विजय तेलंग,नांदेड जिल्ह्यातील कलाल समाजाचे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
कलाल समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून त्यावर योग्य उपाय योजना करण्यात येत नसल्याच्या टीकाही यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून केली आहे.सरदार सरवई पापन्ना गौड यांचे स्मारक महाराष्ट्रभर झाले पाहिजे तसेच कलाल समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीग्रह झाले पाहिजे अशा अनेक मागण्या येत्या काळात सरकार दरबारी मांडण्यात येणार आहेत. एकत्र येऊन एकजूट करण्याची गरज आहे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. पुढील काळात समाज उन्नतीसाठी वधुवर परिचय मेळावे, शैक्षणिक मेळावे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय कलाल, गौड युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष सुनील प्रभाकर अनंतवार ,शंकर रायफलवार,गजाजन अनंतवार, नागनाथ कुच्चेवार, अनंतवार आदींनी प्रयत्न केले आहेत
No comments:
Post a Comment