जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबाखू मुक्तीची शपथ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 15 August 2022

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबाखू मुक्तीची शपथ

नांदेड  दि. 15 :- भारत सरकारचा तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा व महाराष्ट्र शासनाच्या याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उपस्थितांना तंबाखु मुक्तीची शपथ दिली. नियोजन भवन येथील सभागृहात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रमात ही शपथ घेतली.


शपथ


तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई-हुक्का, ई-सिगारेट व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे होणारे आजार यांच्या दुष्परीणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा  संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त रहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा व थुंकदानीचा वापर करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 तसेच महाराष्ट्र शासनाचा तंबाखूजन्य पदार्थ यांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त व ई-सिगारेट मुक्त करेन. मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन.  


No comments:

Post a Comment

Pages