तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत ; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाचा नवा अध्याय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 15 August 2022

तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत ; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाचा नवा अध्याय


नांदेड  दि. 15 :- भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय अर्थात किन्नरांना इतरांसारखेच समान अधिकार बहाल केलेले असून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच किन्नर सेजल हिला सेतू सुविधा केंद्र आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सन्मानपूर्वक हस्तांतरीत केले. याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फित कापून प्रस्तावित होते. तथापि डॉ. इटनकर यांनी सेजलला पुढे करून तिच्याच हस्ते या सेतू सुविधा केंद्राचा शुभारंभ करून सामाजिक न्यायाचा नवा अध्याय सुरू केला. 


यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, समाज कल्याण आयुक्त तेजस माळवदकर व मान्यवर उपस्थित होते. किन्नरांसाठी असलेल्या सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी गोधने, नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने किन्नरांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठीही यापूर्वी बैठका घेऊन निर्देश दिलेले आहेत. त्यांच्या स्मशानभूमीचाही प्रश्न आता मार्गी लागला असून यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विशेष लक्ष दिले आहे.


No comments:

Post a Comment

Pages