औरंगाबाद दि.१४ देशभरात मागासवर्गीय,अल्पसंख्याक, आदिवासी बांधवावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना केंद्र व राज्य सरकार कडून हिंदुराष्ट्राच्या नावाखाली दहशत माजवली जात आहे,कोर्टातही होणाऱ्या अनेक निर्णयात भेदाभेद केला जात असल्याने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झालेले असल्याने आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने एल्गार मार्च काढून केंद्र व राज्यसरकारचा निषेध करण्यात आला.
एल्गार मार्च मध्ये राजस्थान येथील इंद्र मेघवाल ह्याला पाण्याच्या माठाला हात लावल्याने शिक्षकाच्या मारहाणीत त्याचा झालेला मृत्यू,गुजरात दंगलीत बिलकीस बानो च्या बलात्काऱ्यांची कोर्टाने केलेली निर्दोष मुक्तता,औरंगाबाद, पिसादेवी येथील जनार्दन कासरेंची झालेली हत्या,खिर्डी खुलताबाद येथील किरण चव्हाण ची हत्या,हिंगोलीतील दिक्षा वाठोरे हिला प्रेमप्रकरणात विष पाजून ठार करण्यात आले,धुळे येथे पोळ्यात सहभाग घेतला म्हणून घातलेला बहिष्कार,पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी होणारे बहिष्कार ह्या मुळे देशात द्वेषाचे राजकारण सुरू असल्याने हे प्रकार संविधानिक मूल्यांची पायमल्ली करणारा असल्याने ह्या विरोधात लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त ह्यावेळी होता.
विभागीय आयुक्तमार्फत मा.पंतप्रधान ह्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात पिसादेवी,खिर्डी,हिंगोली येथील प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, गुन्ह्याच्या स्वरूपानुसार खटले अंडर ट्रायल चालविण्यात यावे,CRPC 164 प्रमाणे फिर्यादी व साक्षीदार ह्यांचे कोर्टासमोर जवाब नोंदविण्यात यावे,सदरील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे,मयताच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करून 50 लाख रुपये मदत द्यावी,कुटुंबातील सदस्याला शासकीय नौकरी द्यावी अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
एल्गार मार्चला जेष्ठनेते रतनकुमार पंडागळे ह्यांनी निळा ध्वज दाखवून सुरवात केली.
यावेळी समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड ह्यांनी मार्च चे नेतृत्व केले.तर बाळू गंगावणे,आनंद कस्तुरे,वसंतराज वक्ते,अनिल सदाशिवें,नानासाहेब शिंदे,किशोर गडकर,संतोष मोकळे,गौतम गणराज,सर्जेराव मनोरे,राजू साबळे,राहुल साळवे,बलराज दाभाडे,किशोर खिल्लारे,श्रीरंग ससाणे,सचिन निकम,दीपक निकाळजे,मनीष नरवडे,मनोज वाहुळ,सतीश नरवडे,बाळू वाघमारे,अनिल मगरे,मिलिंद मोकळे,अरविंद कांबळे, संदिप जाधव,संजय सातपुते,गुणरत्न सोनवणे,गुल्लू वाकेकर,प्रा.दीपक खिल्लारे,संदिप आढाव,कमलेश चांदणे,आनंद लोखंडे, सतीश पट्टेकर,रंजित साळवे,प्रा.राजेंद्र पगारे,रामदास ढोले,मिलिंद दाभाडे,प्रा.सुनील वाकेकर,साहेबराव नवतुरे, ज्ञानेश्वर खंदारे,सचिन शिंगाडे,प्रवीण हिवराळे, कुणाल भालेराव,अविनाश कांबळे,सतीश शिंदे,आंनद भिसे,अशोक गरुड,ऍड.अतुल कांबळे,ऍड.तुषार अवचार,सम्यक सरपे,संदीप अहिरे,सचिन गायकवाड, मिलिंद पट्टेकर,दीपक जाधव,दिनेश गवळे,शांतीलाल दाभाडे,विश्वनाथ दांडगे, नागेश केदारे,विजय जाधव,प्राणतोष वाघमारे,विजय शिंगारे, सुनील सोनवणे,सुनील खरात, लक्ष्मण कांबळे, तुषार आदके, सतीश जाधव,राहुल जाधव,अरुण वासनकर, राजेश नावकर,कांतिलाल सोनवणे,राष्ट्रपाल गवई, एड.संजय राव साळवे,आनंद मोकळे,एस पी मगरे,सचिन शिंगाडे,विनोद साबळे,विनोद कासारे,राहुल भालेराव,श्याम तुपे,सूरज पाखरे,मनोज कासारे,सोमनाथ कासारे,प्रा.संजय खरे,गणेश साळवे,सचिन मगरे,रवी सूर्यनारायण, संजय जटवे, लाला बरथुने,प्रवीण बोर्डे,शांतीलाल लसगरे, ऍड.संघपाल इंगळे,अनिल खंदारे,सचिन बागुल,भूषण नावगिरे,विलास गायकवाड, रामराव नरवडे,विलास गायकवाड, सुधाकर दांडगे, अशोक कामिटे, चेतन गिरी,सुनील जाधव,सुधाकर दांडगे,सागर बोर्डे,लक्ष्मी बाई गायकवाड, कांचन सदाशिवे,कामिनी हाडोळे,कैलास वाकेकर, प्रकाश जाधव,संजय म्हस्के, रामदास लोखंडे,रमेश वानखेडे,हिरालाल मगरे,उत्तम जाधव,रमेश मगरे,राजू जाधव,नंदू हिवाळे, गौतम दाभाडे,अमोल घोरपडे,स्वप्नील शिरसाठ,बुद्धभूषण निकाळजे,अविनाश डोंगरे,सोनू पाईकडे,दिलीप जाधव,अमोल भालेराव,अमोल लिहिणार,योगेश सोनवणे, विशाल बनकर,नितीन बनकर,ऋषी मगरे,राहुल निकम,स्वप्नील गायकवाड, गुड्डू वाहुळ,पृथ्वीराज गडवे,प्रसाद आठवले,सचिन दाभाडे,अंकुश शिंदे,सतीश पट्टेकर ,रमेश मगरे,राहुल मकासरे, राहुल मगरे,मिना गायकवाड, यशोदाबाई चव्हाण,परागाबाई राठोड,कविता सातदिवे, सुनीता धनेधर,मयुरी वाघमारे,प्रतिभा चाबुकस्वार, किशन जाटवे,संतोष आकोदे,राजू सुलाने, अक्षय जिनवाल, प्रेम सुलाने,भगवान तरटे, विक्की कुंधारे,संतोष गांगवे, गणेश गांगवे,धनराज बंस्वाल, बाळू बेडवाल आदींसह हजारोंच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment