विद्यार्थ्यांचा न्यायिक आवाज प्रकाशभाई इंगळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 14 September 2022

विद्यार्थ्यांचा न्यायिक आवाज प्रकाशभाई इंगळे

सामाजिक ,शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची  लढाई लढून समस्या सोडवणारे कृतिशील ,उच्चशिक्षित आंबेडकरवादी विद्यार्थी नेता म्हणून प्रकाश इंगळे यांची ओळख आहे.


नागसेनवनातील डॉ बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना    त्यांनी भारिप प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी आघाडीत 2003 पासून 2020 पर्यंत अनुक्रमे नागसेनवन अध्यक्ष ,शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश महासचिव अश्या संघटनात्मक पदांवर काम केले.


एप्रिल 2010 पासून विद्यापीठात भीम जयंती निमित्त 'भीमोत्सव' चे त्याच प्रमाणे रमाई जयंतीनिमित्त 'रमाई महोत्सव' गेल्या सहा वर्षांपासून  आयोजन करत आहेत . विद्यार्थी हिताचे कार्य करत असतांनाच त्यांनी राज्यशास्त्र विषयातून JRF मिळविली त्या पाठोपाठ m.phil. आणि p.hd. चे संशोधन पूर्ण केले.

2018 च्या 416 संशोधक विद्यार्थ्यांना m. phil. ची फेलोशिप मिळवून दिली.

पी.इ. एस.इंजिनिअरिंग कॉलेज व डॉ बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय या दोन्ही ठिकाणी शिक्षण हक्क परिषद घेतली.

क्रांतिचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य विद्यार्थी मोर्चा यशस्वी करून दाखवला.

डिसेंम्बर 2018 मध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलने चे दोन दिवसिय राज्यव्यापी अधिवेशन विद्यापीठात घेण्यात आले. ते यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. केंद्र सरकारच्या NRC, CAA या घातक कायद्या विरोधात  ॲड.  बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद ची हाक दिली त्यालाच प्रतिसाद देत विद्यापीठ एक दिवस बंद करण्यात आले. 2022 मध्ये अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यक संवाद मेळावा घेतला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी (GS) सलग तीन वर्षे 2006-2009 निवडून आले .याच अनुभवावर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची 2017 साली  प्रस्थापितांविरोधात   निवडणूक लढविली आणि 935 मते मिळवली. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणूकित प्रचार प्रमुख म्हणून काम केले. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरीही न डगमगता विद्यार्थ्यांचे हित साधले.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना  प्रकाश भाईंनी अकोला जिल्यातील मजलापूर या छोट्याश्या गावात तुन येऊन नागसेवन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात आपल्या  नेतृत्वाची छाप पाडली . त्यांनी  संघटनात्मक आणि शिक्षण दोहींचाही उत्तम मेळ साधला.

अश्या या अवलियास 38 व्या वाढदिवसाच्या सदिच्छा!

No comments:

Post a Comment

Pages