रिपब्लिकन पक्षाच्या विविध आघाडी च्या अध्यक्षांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 14 September 2022

रिपब्लिकन पक्षाच्या विविध आघाडी च्या अध्यक्षांची निवड

मुंबई  - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) या पक्षांतर्गत विविध आघाडी आणि प्रदेश अध्यक्षांची नियुक्ती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले  यांनी  अधिकृतरीत्या केली असून त्याबाबत ची यादी आज रिपाइं चे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजभाऊ सरवदे आणि राज्य सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे यांनी जाहीर केली. 


रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी पिंपरी चिंचवड येथील  माजी नगरसेविका चांद्रकांताताई सोनकांबळे यांची निवड करण्यात आली आहे. महिला आघाडी च्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी ऍड.आशाताई लांडगे; राष्ट्रीय सचिव पदी शिलाताई गांगुर्डे; महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी ऍड.अभयाताई सोनवणे;  महिला आघाडी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्षपदी मा.  संगीताताई आठवले; महिला आघाडी महाराष्ट्र राज्य सचिवपदी संघमित्राताई गायकवाड यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच रिपाइं युवक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी बीड मधील रिपाइं चे लढाऊ नेते पप्पू कागदे यांची फेरनिवड करण्यात आली आहे


 मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी आघाडी च्या अध्यक्षपदी सुमित वजाळे यांची निवड करण्यात आली आहे.  रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार आघाडी च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी चंद्रकांत जगताप यांची फेरनिवड करण्यात आली आहे. 


रिपब्लिकन पक्षाच्या मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पदी ज्येष्ठ नेते मिलिंद शेळके यांची अधिकृत निवड झाली आहे.तसेच रिपाइं चे  पाश्चिम महाराष्ट्र प्रदेश  अध्यक्ष पदी लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष  सूर्यकांत वाघमारे  यांची निवड झाली असून  पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी अशोक गायकवाड( सातारा) यांची आणि पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी जितेंद्र बनसोडे ( पंढरपूर ) यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी च्या अध्यक्ष पदी रूपा वायदंडे यांची निवड करण्यात आली आहे. त्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी राजा कापसे; कोकण प्रदेश अध्यक्ष पदी  पनवेल चे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड; मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी सिद्धार्थ कासारे;  पूर्व विदर्भ नागपूर प्रदेश अध्यक्षपदी विजय आगलावे  आणि  पश्चिम विदर्भ अमरावती प्रदेश च्या अध्यक्ष पदी मोहन भोयर यांची निवड करण्यात आली आहे अशी अधिकृत घोषणा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री  ना.रामदास आठवले यांनी केली आहे.                                                                            

No comments:

Post a Comment

Pages