खाकी वर्दीतील अधिकाऱ्याच्या कुटुंबाकडून अज्ञान मुलीचे विम्याचे पैसे हडप करून फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 14 September 2022

खाकी वर्दीतील अधिकाऱ्याच्या कुटुंबाकडून अज्ञान मुलीचे विम्याचे पैसे हडप करून फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल

मांडवी -  कोरोना या महामारीमध्ये अनेकांचे कुटुंब उध्वस्त होऊन होत्याचे नव्हते झाले त्याचच एक उदाहरण म्हणजे सुशिक्षित व प्रतिष्ठीत कुटुंबातील व्यक्तीनी आपल्या कुटुंबातील सर्वात लहान व्यक्ती गमावल्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलीला धीर देऊन त्या दोघींच्या पाठीशी राहून त्यांना खंबीरपणे साथ देण्याची वेळ असताना त्या विधवा महिले सह 6 वर्षाच्या अज्ञान मुलीचे आपल्याच रक्ताच्या नात्यातील सामाजिक प्रतिष्ठीत आणि सनदी पोलिस अधिकाऱ्याकडून असे अपेक्षित नसताना फसवणुक झाल्याने संपूर्ण परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे,सविस्तर वृत्त असे की,स्व.सुधिर धरमसिंग चव्हान हे मंत्रालय मुंबई येथे माहिती व तंत्रज्ञान विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना कोरोना विषाणूची लागण होऊन दि.15 जुन 2021 रोजी निधन झाले असता त्यांच्यामार्फत पत्नीच्या व मुलीच्या भविष्यासाठी एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स या विमा कंपनीकडून जीवन विमा पॉलिसी काढण्यात आले होते त्यात नॉमीनी म्हणून पत्नी व अज्ञान मुलगी हे होते परंतु मुलगी कु.बाणीप्रिया सुधीर चव्हाण हि अज्ञान असल्याने पॉलिसीधारक स्व.सुधीर चव्हाण यांनी त्याची आई सौ.सिंधूताई धरमसिंग चव्हान यांना ऑपॉईन्टी म्हणून नियुक्त करण्यात आले होते, विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे ऑपॉईन्टी म्हणजे जो पर्यंत अज्ञान असलेली नॉमीनी 18 वर्षाची होत नाही तो पर्यंत विम्याची रक्कम हि ऑपॉईन्टी स्वतः च्या हितासाठी न वापरता जशास तशी ती रक्कम परत करणे असे असताना नॉमीनी कु.बाणीप्रिया हिची ऑपॉईन्टी सौ.सिंधूताई धरमसिंग चव्हान हिने श्री.धरमसिंग कनीराम चव्हान(व्यापारी), श्री. राहुल धरमसिंग चव्हान (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.स्टे.विरूर ता.राजुरा जि.चंद्रपूर), प्रा.संदिप धरमसिंग चव्हान(यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,वर्धा), श्री.दिलीप कनीराम चव्हान (जि.प.शिक्षक जिवती) सर्व आरोपी राहणार मूळचे म.पार्डी ता.माहुर येथील असून ह.मु.जिवती, ता.जिवती जि. चंद्रपूर यांच्या संगनमताने विम्याची एकूण रक्कम 73 लाख 50 हजार रुपये हडप करून अज्ञान मुलीचे फसवणूक करून तसेच सूनेला मानसिक त्रास,अश्लील नजरेने पाहणे,जिवे मारण्याचा प्रयत्न करणे,पैसे देण्यासाठी वेळोवेळी लालच दाखवणे,आपमनास्पद वागणूक देऊन अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ करणे या संदर्भात अज्ञान मुलीची आई आपल्या माहेरी निराळा तांडा येथे राहत असून फिर्यादी श्रीमती.संजीवनी सुधीर चव्हाण ह.मु. निराळा तांडा हिने सासरकडील मंडळी सासू सौ.सिंधूताई धरमसिंग चव्हान,सासरे श्री.धरमसिंग कनीराम चव्हान(व्यापारी), दिर श्री. राहुल धरमसिंग चव्हान (सहाय्यक पोलीस निरीक्षक),दिर प्रा.संदिप धरमसिंग चव्हान,चुलत सासरे श्री.दिलीप कनीराम चव्हान (जि.प.शिक्षक) सर्व रा.जिवती जि.चंद्रपूर यांच्या विरोधात दि.14/10/2022 रोजी पोलिस स्टेशन,मांडवी येथे भा.द.वी कलम 420, 498A, 504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्री.मल्हारी शिवरकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक,मांडवी हे करीत आहे.

No comments:

Post a Comment

Pages