जागतिक लोकशाही दिनी रंगली हस्ताक्षर स्पर्धा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 15 September 2022

जागतिक लोकशाही दिनी रंगली हस्ताक्षर स्पर्धा

औरंगाबाद दि.१५ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आज मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल येथे जागतिक लोकशाही दिनानिमित्त "आम्ही भारताचे लोक-हस्ताक्षर स्पर्धा " घेण्यात आली.  स्पर्धेत १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत सुबक हस्ताक्षरात भारतीय राज्य घटनेचे प्रास्ताविकाचे लेखन आपल्या हस्ताक्षरात लिहिले.

यावेळी मुख्यध्यापक धन्यकुमार टिळक, शिक्षक भीमराव गायकवाड, योगेश पवार, के. डी. केळकर सचिन निकम, इंजि.अविनाश कांबळे, अ‍ॅड.हेमंत मोरे, सुमित नावकर, प्रसेनजीत गायकवाड आदी उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या स्पर्धेनंतर आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन स्थरावर अशाच स्वरूपात स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment

Pages