नांदेड दि. 20 :- आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांची 250 वी जयंती देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येत आहे. गुरुवार 22 सप्टेंबर रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत महिला सक्षमीकरणावर शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उदघाटन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते सकाळी 8:30 वाजता महात्मा फुले पुतळा, आय.टी.आय येथे होणार आहे. या रॅलीत मोठया प्रमाणात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले आहे.
महिला सबलीकरण, सती प्रथेस प्रतिबंध, मालमत्तेमध्ये महिलांना समान अधिकार, विधवांना पुनर्विवाहचा हक्क मिळणे, बहुपत्नी व बालविवाहस प्रतिबंध, महिलासाठी शिक्षण या महिला सक्षमीकरणात योगदान देणारे आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशातील 250 जिल्हयांमध्ये किमान 250 शाळकरी मुले, प्रामुख्याने मुलीचा सहभाग असलेल्या महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांची जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये नांदेड शहरातील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, प्रतिभा निकेतन, शिवाजी विद्यालय व केंब्रिज विद्यालय शाळेतील 250 विदयार्थी सहभागी होणार आहेत. या रॅलीच्या उदघाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड. गंगाधर पटने यांची उपस्थिती राहणार आहे.
No comments:
Post a Comment