विश्वजीत मुंगे अर्थशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 20 September 2022

विश्वजीत मुंगे अर्थशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना

नांदेड ,जयवर्धन भोसीकर :

येथे महाराष्ट्र विद्युत महामंडळात इंजिनियर असलेले विश्वजीत विलास मुंगे हे अर्थशास्त्राच्या उच्च अभ्यासासाठी  किंग्स कॉलेज लंडन येथे उच्च शिक्षणासाठी आज रवाना झाले.

त्यांचे वडील हे रेल्वेमध्ये वरिष्ठ तिकीट चेकर आहेत. त्यांनी इलेक्ट्रिक इंजीनियरिंग मध्ये आपली पदवी घेऊन महाराष्ट्र विद्युत मंडळात ते  डेप्युटी इंजिनियर म्हणून कार्यरत होते. त्यांनी उच्च शिक्षणासाठी कार्यालयीन सुट्टी घेऊन महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली व या माध्यमातून ते अर्थशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी लंडन येथील किंग्स कॉलेजमध्ये शिकण्यासाठी रवाना झाले.

देश व आंबेडकरवादी चळवळीला अर्थशास्त्र मध्ये योगदान देणे हे आपले यामागे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तळागाळातील व्यक्तीचा आर्थिक उन्नतीसाठी ज्या योजना देशपातळीवर राबवल्या जातात त्यासाठी अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेऊन आपणाला योगदान द्यावयाचे आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी त्यांच्या ह्या निवडीबद्दल व उच्च शिक्षणास रवाना होण्याबद्दल अभिनंदन केले .

 नवीन पिढीने जगभरातील उच्चत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन अर्थशास्त्र, कायदा व विज्ञानाचा सर्वोच्च अभ्यास करावा असे याप्रसंगी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Pages