औरंगाबाद, दि.22:
जागतिक लोकशाही दिनानिमित्त मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल येथे आम्ही भारताचे लोक-हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती स्पर्धेचे बक्षीस वितरण आज मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल येथे उत्साहात पार पडले स्पर्धेत १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत सुबक हस्ताक्षरात भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविकाचे लेखन केले होते.
मराठी आणि इंग्रजी अश्या दोन भाषेत विद्यार्थ्यांनी सुबक लिखाण केले त्यात मराठी माध्यमातून जान्हवी रघुनाथ बोर्डे ह्या ५ वि वर्गातील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला तर आदित्य जोगेंद्र पगारे (७ वि),सर्वज्ञा सुनील सावंत (६ वि) ह्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला तर इंग्रजी माध्यमातून स्वाती किशोर अवचार (९ वि वर्ग ) हिने प्रथम क्रमांक तर प्रांजल रवींद्र गायकवाड,नयना विकास जाधव ह्यांनी अनुक्रमे दुसरा तिसरा क्रमांक पटकावला.
दोन्ही गटातील ५-५ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धन्यकुमार टिळक हे होते तर शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठान चे अध्यक्ष अॅड.धनंजय बोरडे, विलास जगताप,डॉ.अविनाश सोनवणे,सचिन खाजेकर,अमित घनघाव,यंग बुद्धिस्ट असो.चे सोनू नरवडे ह्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निकम,अॅड.हेमंत मोरे,आनंद सूर्यवंशी, इंजि.अविनाश कांबळे,प्रसेनजीत गायकवाड,अॅड.तुषार अवचार,मुकेश घुमारे,संतोष भिंगारे, संदीप अहिरे,सम्यक सर्पे,आकाश अढागळे,आशिष खोतकर,शिक्षक भीमराव गायकवाड, योगेश पवार, के. डी. केळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment