किनवट:दि 21.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज बुधवार दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी भव्य पेन्शन संदेश बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये तालुक्यातील शेकडो शासकीय कर्मचारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता ठाकरे चौक गोकुंदा येथून निघालेल्या मोटार सायकल रॅलीची सांगता ए.आ.वि. कार्यालय किनवट येथील सभेने झाली.
आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.की, गेल्या सतरा वर्षापासून सर्वांना जुनी पेन्शन लागू व्हावी,यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे परंतु या मागणीची दखल राज्य शासनाने घेतलेली नाही.
राजस्थान,छत्तीसगड व झारखंड या राज्याने त्यांच्या राज्यातील 2005 नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली आहे.
त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहेत.
या आंदोलनामध्ये किनवट प्रकल्प समिती अध्यक्ष श्री धम्मरत्न घुले, सचिव गजानन मेंडके व पदाधिकारी राजेंद्र जोगदंडे, महेश बिंगेवार, संजय पुरी, अमोल झडते , उमेश भालेराव, संतोष राठोड, नरेंद्र पवार, स्मिता पोहरकर तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेचे श्री चंद्रकांत घुगे , हनुमंत वाडेकर , विकास पुरी ,सुमेध भवरे व इतर कर्मचारीमोठ्या संख्येने उपस्थित होते .
No comments:
Post a Comment