दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवा निमित्य महाराष्ट्रातील पँथर्सचा गौरव सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 September 2022

दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवा निमित्य महाराष्ट्रातील पँथर्सचा गौरव सोहळा

नांदेड : दलित पँथर या ऐतिहासिक क्रांतिकारी संघटनेचे २०२२ हे वर्ष राज्यभरात सुवर्ण ममहोत्सवी  वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.या संघटनेत असंख्य कार्यकर्ते ,पदाधिकारी आजही आंबेडरवादी चळवळीचे नेतृत्व करीत आहेत.पँथर लढ्यातील शहिदांच्या वारसांचा आणि राज्यातील पँथर्सचा यथोचित गौरव सोहळा चळवळीची क्रांतिभूमी असलेल्या नांदेड शहरात ता.१४ आक्टोबर रोजी दु.2 वाजता कुसुम सभागृहात आयोजित केला आहे.


         या सोहळ्याचे उद्घघाटन माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर हे करणार आहेत.या सोहळ्याला प्रमुख अतिथी  ॲड. जयदेव गायकवाड ,दिवाकर शेजवळ माजी मंत्री गंगाधर गाडे यांची उपस्थिती लाभणार आहे,तर आंबेडकरी चळवळीचे समीक्षक  प्रा. एम.आर.कांबळे, प्रा. डॉ. प्रकाश मोगले हे  प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. स्वागताध्यक्ष सुरेशदादा गायकवाड आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार हे असणार आहेत.


      दु.2 वाजता पँथर लढ्यातील शहिदांच्या वारसांचा त्याचप्रमाणे पँथर्सचा गौरवदेखील होणार आहे.

          या सोहळ्यात बी.व्ही. जोंधळे, रामभाऊ पेटकर,किशोर थोरात,प्रा.सुनील मगरे, गौतम लांडगे, प्रा.प्रतिभा अहिरे,राजानंद सुरडकर ,जी.पी.मिसाळे, संजय उजगरे यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

दु.१२ वा. शाहीर गौतम पवार यांचा क्रांतिकारी आंबेडकरी जलस्याचे सादरीकरण होणार आहे.

या गौरव सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. देविदास मनोहरे, पी. एस.गवळे. जे.डी. कवडे,रवी गायकवाड, नंदकुमार बनसोडे, दत्ता हरी धोत्रे,पंडीत आढाव, राहुल गायकवाड, ॲड. बादलगांवकर, शिलरतन चावरे, चंद्रकांत भालेराव, बबिता पोटफोडे, बि.बी.पवार, वामनराव कावले,बापूसाहेब सावंत, अंबादास हनमंते, एस.ङि दामोदर, विकास गजभारे,भगवान गायकवाड, भिमराव भुरे,स्वप्निल नरबाग,दिपक सावते व गब्बर सोनवणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages