औरंगाबाद:
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण लम्पी चर्म रोग व अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकांची पाहणी दौऱ्यावर कन्नड येथे असताना आठेगाव येथील तातेराव सर्जेराव साबळे ह्या शेतकऱ्याच्या घरी त्यांनी भेट देत कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याच्या पत्नी व मुलांस भेट देत शासन व प्रशासन तुमच्या मागे खंबीर उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनातर्फे त्यांना ५०,००० रुपयांची मदत व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अजूनही शक्य ती मदत करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कन्नडचे उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, संजय वरकड (तहसीलदार कन्नड), तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक,कृषी सहाय्यक अधिकारी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment