औरंगाबाद : सुभेदारी विश्रामगृह येथे आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने दि.१४ सप्टेंबर राजी काढण्यात येणाऱ्या ' एल्गार मार्च ' च्या नियोजनाची बैठक पार पडली.
दि.१४ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता भडकलगेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून टाऊन हॉल उड्डाणपूल मार्गे आमखास मैदान येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर एल्गार मार्च धडकेल त्या नंतर देशभरातील मागासवर्गीय, अल्पसंख्याक,आदिवासीच्या होणाऱ्या हत्या व अत्याचाराच्या घाटनाच्या निषेधार्थ मा.पंतप्रधान ह्यांना विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन देण्यात येणार आहे.
सदरील बैठकीस समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड ह्यांनी मार्गदर्शन केले तर अध्यक्षस्थानी किशोर गडकर हे होते तर प्रास्ताविक सचिन निकम ह्यांनी केले तर राजू साबळे,राहुल साळवे, आनंद कस्तुरे,संतोष मोकळे,अरविंद कांबळे,सर्जेराव मनोरे,ऍड.भागतराज भालेराव,विश्वनाथ दांडगे, प्रा.सिद्धोधन मोरे,किशोर खिल्लारे,प्रा.दिपक खिल्लारे,दीपक निकाळजे,सतीश नरवडे,मनीष नरवडे, यांनी नियोजनाबाबत मनोगत व्यक्त केले.
ह्यावेळी वसंतराज वक्ते,अनिल मगरे,संजय सातपुते,मनोज वाहुळ,रणजित साळवे,सुनील खरात,प्रवीण बोर्डे,रामदास ढोले,राहुल वडमारे,रामराव नरवडे,राहुल जाधव,सचिन मिसाळ,पंकज सुकाळे, पवन पवार,किशोर ससाणे,राष्ट्रपाल गवई,श्याम तुपे,सचिन शिंगाडे,अमीन देशमुख,सय्यद रिजवान, मो.उमर, मुद्दसर खान,चेतन गिरहे,प्रकाश घोरपडे,विलास गायकवाड, शेख सईद,प्रवीण बुराडे,प्रवीण केदारे,रामराव निकाळजे,रवींद्र निकाळजे,प्रवीण हिवराळे,सतीश शिंदे,विकास साठे,अनिल मोरे,हेमंत खोतकर,नदीम खान,शेख मुसा आदींसह भीमसैनिक उपस्थित होते. एल्गार मार्च मध्ये मोठ्या संख्येने भीमसैनिक,माता भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment